टोमॅटो खाण्याचे फायदे

health benefits of tomato
टोमॅटो खाण्याचे फायदे

स्वयंपाक घरात टोमॅटोशिवाय कोणतीही ग्रेव्ही रेसिपी तयार होऊ शकत नाही. दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचा वापर भाजी म्हणूनच करतो. पण खरंतर हे एक फळ आहे. टोमॅटो चवील जितका छान तितकाच तो खूप गुणयुक्त आहे. टोमॅटो हा अनेक आजारांचा सामना करू शकतो. त्यामुळे आज आपण दरदरोज खात असलेला टोमॅटोचे फायदे जाणून घेणार आहोत.

  • टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने शरारीला उर्जा मिळते.
  • उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीला टोमॅटोचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
  • मोठ्यांनाच नाहीतर लहानग्यांसाठीही टोमॅटोचा ज्यूस फायदेशीर आहे. टोमॅटोमुळे मानसिक आणि शारीरिक विकासात  मदत होते.
  • तसेच लहान मुलांच्या पोटात जंत असल्यावर रिकाम्या पोटी टोमॅटो ज्यूसमध्ये काळीमिरी टाकून प्यायल्याने फायदा होता.
  • शिवाय टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असल्याने डोळ्यांची नजर वाढवण्यास मदत होते. तसेच मोतीबिंदूचा त्रास असलेल्या व्यक्तीला देखील टोमॅटो खूप फायदेशीर असतो.
  • टोमॅटोचे सेवन केल्याने वजन देखील आटोक्यात येऊ शकते.
  • टोमॅटोमध्ये असलेल्या लायकोपीन नावाचा घटक भरपूर प्रमाणात असल्याचे तो कोणत्याही प्रकारचा कॅन्सर रोखण्यास मदत करतो.
  • इतकेच नाही तर ट्यूमर असणाऱ्या व्यक्तीला ट्यूमर कमी करण्यास आणि त्याची वाढ थांबवण्यास देखील टोमॅटो फायदेशीर असतो.
  • टोमॅटोमधील व्हिटॅमिन आणि कॅल्शिअम ही दोन्ही तत्त्वे हाडांना मजबूत करण्याचे काम करते.
  • तसेच टोमॅटोमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडंट हाडातील दोष दूर करण्यात मदत करते.