घरलाईफस्टाईल'ही' आहे सर्वात आरोग्यदायी भाजी

‘ही’ आहे सर्वात आरोग्यदायी भाजी

Subscribe

करटोली या भाजीपासून शरीराला होणारे फायदे

आपल्या आहारात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश असतो. तसेच आपल्याला डॉक्टर देखील पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. कारण भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषणमूल्य असते. मात्र, कोणत्या भाजीत किती पोषणमूल्य असतात आणि त्याचा आपल्या शरीराला किती फायदा होतो. याची आपल्याला माहिती नसते. त्यामुळे आज आपण अशाच एका भाजी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्या भाजीला शक्तीशाली म्हणून देखील बोले जाते. या भाजीचे नाव आहे करटोली. करटोली या भाजीपासून शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

प्रथिने मिळतात

- Advertisement -

करटोली या भाजीमध्ये मांसाहारातून मिळणाऱ्या प्रथिनांच्या बरोबरीने प्रथिने असतात. तसेच शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे अँटीआँक्सिडंट सुद्धा करटोलीच्या भाजीमध्ये असतात.

मधुमेह, रक्तदाब असणाऱ्यांना फायदेशीर

- Advertisement -

करटोलीच्या भाजीचे सेवन हे मधुमेह, रक्तदाब आणि तणावाने ग्रासलेल्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर असते. करटोलीच्या भाजीमुळे रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रित राखले जाते.

पोटाशी निगडित आजार

करटोलीच्या भाजीच्या सेवनाने पोटाशी निगडित आजार अपचन, बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळण्यास मदत होते.

डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते

करटोलीच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात केटोरोईनेडस असतात. या घटकामचळे डोळ्यांचे आरोग्य नीट राखले जाते.

मुळव्याध

करटोली ही उत्तम विरेचन गुणधर्म असलेली भाजी आहे. मुळव्याधीवरही करटोलीची भाजी गुणकारी ठरते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -