Corona च्या काळात या गोष्टींचे सेवन करा, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिला सल्ला!

देशातमागील २४ तासात ९४,३७२ नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. आता कोरोनाबाधितांची संख्या ४७,५४,३५७ वर पोहचली आहे. पण अजूनही कोरोना प्रार्दुभाव कमी होताना दिसत नाहीये. पण या काळात आरोग्याची काळजी घेणं हा एकमेव उत्तम पर्याय आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. अनेकांनी आतापर्यंत कोरोना काळात वेगवेगळ्या काढ्यांचे सेवन करण्याबाबत सल्ले दिले असतील. पण नेमकी कोणती पद्धत गुणकारी आहे याबाबत आरोग्य मंत्रालयाने आज सविस्तर माहिती दिलीये,  यासाठी Post COVID Management Protocol सांगणारे पत्रक जारी केलं आहे.

कोरोना रिकव्हर रुग्णांनी तर आवर्जुन पाळायला हव्यात याशिवाय इतरांंनी सुद्धा खबरदारी साठी यांचे पालन करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिलेला आहे.

– कोरोनाबाधित असो वा नसो घराबाहेर पडताना मास्क वापरणं अनिवार्य आहे.

– संध्याकाळी निदान ३० मिनिटांचा वॉक घेणं गरजेचं आहे

– कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.

– प्राणायम करा. क्वारंटाईनच्या काळात  पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करा

– कोरोना काळात आयुष मंत्रालयाकडुन सांगण्यात आलेल्या या आयुर्वेदिक गोष्टींचे नियमित सेवन करणे फायद्याचे ठरु शकते,

-आयुष क्वठ (१५० ml – १ कप) रोज सकाळी.

– समश्मनी वटी (दिवसातुन दोन वेळा ५०० mg)

– गिलॉय पावडर ( १ ते ३ ग्राम) कोमट पाण्यातुन १५ दिवस घ्यावी

– अश्वगंधा पावडर (१ ते ३ ग्राम) कोमट पाण्यातुन दिवसातुन दोनदा १५ दिवस घ्यावी.

– रोज एक आवळा

– सुका खोकला असल्यास १ ते ३ ग्राम मुलेठी पावडर कोमट पाण्यातुन घ्यावी

-हळद दुध (सकाळ/संध्याकाळ) एक पेला

-हळद आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा.

– 1 टीस्पुन च्यवनप्राश नियमित घ्या