घरलाईफस्टाईलरोज खात असलेले 'हे' पदार्थ ठरू शकतात धोकादायक

रोज खात असलेले ‘हे’ पदार्थ ठरू शकतात धोकादायक

Subscribe

हेल्दी पदार्थ खाताना योग्य ती काळजी घेणेही गरजेचे आहे.

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. हेल्दी पदार्थ खाणे कधीही उत्तम. पण हेच हेल्दी पदार्थ खाताना योग्य ती काळजी घेणेही गरजेचे आहे. जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे खाताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

चेरी बीज


चेरी हे फळ अनेक आजारांवर उपयोगी आहे. चेरी खाल्ल्यामुळे पचनक्रियाही सुधारते. पण या चेरी फळाची बी हानिकारक ठरू शकते. चेरीचे बी खुप टणक असते. त्यात प्रूसिक नावाचे एसिड असते जे खूप विषारी असते. त्यामुळे चेरी खाताना चेरीचे बी खाऊ नका.

- Advertisement -

सफरचंद


सफरचंदाच्या बिमध्ये काही प्रमाणात साइनाइड असते. सफरचंदाच्या बीमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. सफरचंदाची बी नकळतपणे गिळल्यास काही हरकत नाही. सफरचंदाच्या बिवर सुरक्षाकवच असते जे साइनाइडला शरीरात प्रवेश करण्यास रोखते. कधीही सफरचंद खाताना त्यातली बी काढून घा.

जायफळ


थोडेसे जायफळ आपल्या पदार्थांची चव वाढवतात. पण त्याच जायफळचे सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारकही आहे. जायफळामध्ये मोठ्या प्रमाणात मिरिस्टिसिन नावाचे रसायन असते. त्यामुळे जायफळाचे अतिसेवन केल्यास चक्कर येणे, झोप येणे,सुस्ती येणे यासांरख्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.

- Advertisement -

कच्चे काजू


दुकानात पॅकिंग केलेले काजू मिळतात. कच्च्या काजूमध्ये उरूशिओल नावाचा विषारी पदार्थ असतो. त्यामुळे कच्चे काजू खाल्याने शरीरात एलर्जी निर्माण होऊ शकते. त्यामुळे कच्चे काजू खाणे टाळा.

बदाम


बदाम खाताना नीट बघून खा. कडू बदामामध्ये मोठ्या प्रमाणात एमिगडलिन नावाचे केमिकल असते. ज्यामुळे पोटदुखी,उल्टी यासारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे कधीही कडू बदाम खाऊ नका.

हिरवा बटाटे


हिरवे किंवा मोड आलेले बटाटे खाणे टाळा. त्यात ग्लाइकोसाइड नावाचा विषारी पदार्थ असतो. ग्लाइकोसाइड हिरवा किंवा कच्चा बटाटा खाल्ल्याने डोकेदुखी,मळमळ सारख्या समस्या होऊ शकतात.


हेही वाचा – हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावताय का? त्या आधी हे वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -