घरलाईफस्टाईल'ब्लू टी' प्या.. फिट राहा

‘ब्लू टी’ प्या.. फिट राहा

Subscribe

… म्हणून असतो ‘निळा’ रंग

फिट राहण्यासाठी लोक सहसा ‘ग्रीन टी’ किंवा ‘ब्लॅक टी’ पितात. मात्र, फिटनेसवर भर देणाऱ्या फार कमी लोकांना ‘ब्लू टी’ बद्दल ठाऊक असेल. ‘ब्लू टी’ आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. आज आम्ही तुम्हाला या स्पेशल चहाविषयी माहिती देणार आहोत. ब्लू टी गोकर्णाच्या फुलांपासून बनवला जात असल्यामुळे त्याचा रंग निळा असतो. गोकर्णीचे फूल जितके सुंदर दिसतं तितकंच ते आरोग्यासाठीही फायदेशीर असतं.

- Advertisement -

ब्लू टी पिण्याचे फायदे

विषारी घटकांना मारक – ब्लू टीमध्ये अँटी ऑक्सीडंट मोठ्य़ा प्रमाणात असतं. फुलामध्ये आढळणारे Bio compounds हे घटक तुमच्या शरीराचं विषारी घटकांपासून संरक्षण करतात.

हृद्यासाठी लाभदायक – जेवणाआधी किंवा जेवणानंतर ब्लू टी घेतल्यास, तुमच्या शरीरातील ग्लुकोज आणि ब्लड शुगरचं प्रमाण संतुलित राहतं. याचा फायदा ऱ्हदयाला होतो.

केस आणि त्वचेचं संरक्षण – ब्लू टीमध्ये विटामिन्स आणि मिनरल्स मोठ्या पुरेशा प्रमाणात असतात. तुमच्या केसांना आणि त्वचेला याचा फायदा होतो.

थकवा-तणाव पळवतो दूर – ब्लू टीच्या सेवनामुळे तुमच्या चिंता आणि तणाव दूर होऊन तुम्हाला रिफ्रेश वाटतं.

कॅन्सरपासून करतो संरक्षण – गोकर्णाच्या फुलामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेले अँटी ऑक्सीडंट कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतो.

मधुमेह ठेवतो नियंत्रणात – गोकर्णाच्या फुलामधील काही घटक ग्लुकोज कंट्रोल करतात. त्यामुळे डायबिटीक व्यक्तींना ब्लू टीचं सेवन करणं चांगलं.

- Advertisement -

‘असा’ बनवा ब्लू टी…

सगळ्यात आधी पाणी गरम करायला ठेवा. त्यामध्ये गोकर्णाचे फूल हलकसे चुरडून घाला आणि त्यानंतर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर मिक्स करा. चहा गाळतेवेळी फूल बाजूला काढा. तुमचा ब्लू टी तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -