मनुक्याचे आरोग्यदायी फायदे

गोडाधोडाच्या खाद्यपदार्थांमध्ये मनुके आवर्जून वापरले जातात. मनुके दिसायला लहान असले तरी ते खाल्ल्याने आपल्याला सुदृढ आयुष्य लाभते. पाण्यात भिजवलेले मनुके खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. त्यामुळे मनुक्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया...

Mumbai
मणुक्याचे आरोग्यदायी फायदे
  • मनुक्यामध्ये व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो. रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी रात्री अर्धा ग्लास पाण्यामध्ये ८ ते १० मनुके भिजत ठेवून सकाळी उठून काही न खाता मनुक्याचे हे पाणी प्यावे. पाण्यात भिजवलेले मनुके खाणेसुद्धा आरोग्यदायी आहे. मनुक्यात अधिक प्रमाणात पोटॅशियम असते.
  • वजन वाढण्यासाठी मनुके खावे. दररोज मनुके खाल्ल्याने वजन वाढवण्यास खूप मदत होते.
  • मनुक्याचे पाणी नियमित पिणे आरोग्यदायी ठरते. निरोगी यकृतासाठी मनुके उपयुक्त ठरतात. तसंच मनुके खाल्याने आपली चयापचय पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
  • दररोज मनुके खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. मनुक्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. गडघेदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी नियमित मनुके खावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here