घरलाईफस्टाईलनाश्ताला करा 'दुधी थेपले'

नाश्ताला करा ‘दुधी थेपले’

Subscribe

बिनतेलाचे हेल्दी दुधी थेपले

बऱ्याचदा सकाळी ऑफिसला जाताना किंवा सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्हाला चमचमीत खायचे असल्यास ‘दुधी थेपले’ नक्की ट्राय करा.

साहित्य

- Advertisement -

२ कप किंवा पाव किलो गव्हाचे पीठ
पाऊण कप दुधी
१ चमचा दही
अर्धा चमचा हळद
४-५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
४-५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या
१ चमचा तेल
चवीनुसार मीठ
चिमूटभर साखर

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम दुधी चांगला किसून घ्या. त्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी गाळून बाजूला काढा. आता किसलेल्या दुधीत गव्हाचे पीठ, दही, हळद, हिरव्या मिरच्या, लसूण, तेल, मीठ आणि हवी असल्यास साखर घालून चांगले मळून घ्या. त्या मळलेल्या पीठाचे १५ समान गोळे करून घ्या. गोलाकार लाटून नॉन-स्टीक तव्यावर मंद आचेवर हे थेपले तेल न लावताच शेकून घ्या. प्रवासात नेताना हिरवी पुदीना चटणी, दही किंवा बटाट्याच्या भाजी सोबत ते खाता येतील. मात्र, गरमगरम थेपले मसाला चहासोबत खूपच छान लागतात, असे खमंग थेपले नक्की ट्राय करून पाहा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -