घरलाईफस्टाईलआरोग्यास फायदेशीर पालक

आरोग्यास फायदेशीर पालक

Subscribe

पालकात जे गुण आढळून आले आहे ते सामान्य भाज्यांमध्ये सापडत नाहीत. हेच कारण आहे की पालक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी, सर्वसुलभ आणि स्वस्त आहे. पालक या पालेभाजीमध्ये कॅरोटिन, फॉलिक अ‍ॅसिड, क जीवनसत्त्व असल्याने गर्भवती महिलांसाठी ही भाजी अत्यंत आरोग्यदायी आहे.पालक दुधाला देखील पर्याय ठरू शकते. ज्यांना दुध आवडत नाही त्यांनी पालकापासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ करून खावेत.

पालक-पनीर, पालक-पुरी, आलू-पालक, पालक-पकोडे अशा निरनिराळ्या प्रकारे आहारात या गुणकारी भाजीचा समावेश करता येतो. दुबळ्या शरीरयष्टीच्या मुलांची हाडे बळकट करण्यास या भाजीचा उपयोग होऊ शकतो. अनेक जीवनसत्त्वे व क्षारांनी परिपूर्ण अशी ही भाजी लहान-थोरांना पथ्यकर आहे.

- Advertisement -

जपानमधील एका संशोधनात पालक भाजीमध्ये काही कर्करोगप्रतिरोधी घटक आढळून आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. पालक हृदयविकार, आतड्याच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी भाजी असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. पालक खाल्ल्याने मेंदूच्या कार्यशक्तीमध्ये नियमितता येत असल्याचे अमेरिकास्थित कृषी संशोधन केंद्राच्या एका संशोधनात आढळून आले आहे. पालकमधील जीवनसत्व ‘क‘ मुळे हाडांचा ठिसूळपणा घटत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -