घरलाईफस्टाईलसौंदर्यासोबतच मेंदीत आहेत आरोग्यदायी गुणधर्म

सौंदर्यासोबतच मेंदीत आहेत आरोग्यदायी गुणधर्म

Subscribe

आता सणावाराच्या दिवसात नटण्या-सजण्याबरोबर मेंदीचा वापर आवर्जून करण्याकडे स्त्रियांचा कल असतो. सौंदर्यसाधनेमध्ये मेंदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मेंदीच्या पानातील रंगद्रव्यामुळे तसेच फुलातून मिळणार्‍या सुगंधी द्रव्यांमुळे मेंदीला व्यापारी महत्त्वही आहे.

* मेंदीमध्ये अनेक औषधी गुणतत्त्वे आहेत. मेंदीच्या खोडाच्या सालीच्या अर्कामुळे त्वचारोग, पांढरे कोड आदी विकार दूर होतात.

- Advertisement -

* मेंदीच्या सालीच्या काढ्याने मुतखडा दूर करता येतो. मेंदीच्या पानांचा लेप गळवे, जखमा, खरचटणे, भाजणे किंवा त्वचेचा दाह इत्यादींवर बाह्य उपचार म्हणून उपयुक्त ठरतो.

* मेंदीच्या पानांमध्ये वांतिकारक आणि कफोत्सारक गुणधर्म आहे. घसादुखी असल्यास गुळण्या करताना पाण्यात मेंदीची पाने घातली जातात.

- Advertisement -

* पायांची आग शमवण्यासाठी, शरीरातील अतिरिक्त ऊर्जा उत्सर्जित करण्यासाठी, डोकेदुखी थांबवण्यासाठी मेंदी डोक्याला किंवा पायाला लावतात.

* मेंदीच्या पानांचा, सालींचा अर्क क्षयविकार दूर करण्यासाठी उपयोगात येतो. मेंदीच्या फुलातून टीरोझसारखे सुगंधी द्रव्य प्राप्त होते. यालाच हीना किंवा मेंदीतेल म्हणतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -