आरोग्यदायी हळदीचे दूध

Mumbai
Turmeric Milk

दूध आणि हळदीमध्ये औषधी गुणधर्म असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी असते. सर्दी होण्याच्या समस्येवर ‘हळदीचे दूध’ हा एक रामबाण उपाय आहे. हळदीच्या दुधाचे आपल्या शरीरास अनेक फायदे आहेत ते असे.

सर्दी-खोकल्यापासून आराम
सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी हळदीचे दूध हा बहुगुणी घरगुती उपाय आहे. हळदीमध्ये जंतूनाशक गुणधर्म असल्याने घशातील खवखव कमी करते तसेच दुधामुळे श्वसनमार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होते.

रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते
हळदीचे दूध प्यायल्यास रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. तसेच हळदीतील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकामुळे विषारी घटक बाहेर पडतात.

डोकेदुखी व अंगदुखी कमी होते
हळदीच्या दुधामध्ये ‘अ‍ॅन्टीऑक्सिडंट’ गुणधर्म अधिक असल्याने डोकेदुखी व अंगदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते.

सांधेदुखी कमी होते
हळदीचे दूध प्यायल्याने शरीरातील सांधे बळकट होतात आणि गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. तसेच वेदना कमी झाल्याने सांधेदुखी रुग्णांच्या शरीरातील स्नायूंची लवचिकता वाढते.

शांत झोप लागते
झोपण्यापूर्वी तासभर आधी ग्लासभर गरम दूध प्यायल्यास शांत झोप मिळण्यास मदत होते. दुधातील सेरोटोनीन व मेलॅटोनीन ताण कमी करतात.

स्त्रियांना मासिकपाळी दरम्यानचा त्रास कमी होतो
मासिकपाळीच्या पहिल्या दिवशी किंवा पाळीचे चक्र चुकल्यास अनेक स्त्रियांना तीव्र वेदना होतात. या समस्येपासून बचावण्यासाठी नेहमी हळदीचे दूध प्यावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here