घरलाईफस्टाईलघोंगावणाऱ्या माश्यांमुळे तुम्हीही त्रस्त आहात? चिंता सोडा हे करा उपाय

घोंगावणाऱ्या माश्यांमुळे तुम्हीही त्रस्त आहात? चिंता सोडा हे करा उपाय

Subscribe

घोंगावणाऱ्या माश्यांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर हे करा उपाय.

पावसाळा आला की संपूर्ण वातावरण बदलून जाते. हवेत गारवा जाणवू लागतो. कारण थंड वातावरणात गरमागरम खाण्याची मज्जाही काही औरच असते. त्यामुळे अनेकांना पावसाळा आवडतो. पण, या पावसाळात अनेक आजार देखील डोकं वर काढतात. यामुळे त्रास देखील जाणवतो. मात्र, याहीपेक्षा पावसाळ्यात सतत घोंगावणाऱ्या माशा सर्वात त्रासदायक ठरतात. चेहऱ्याभोवती किंवा पदार्थांभोवती एकसारख्या घोंगावतात. त्यामुळे या त्रासदायक माश्यांपासून सुटका करुन घ्यायची असेल तर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतात.

लिंबू

- Advertisement -

लिंबू हे माश्या पळवून लावण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यासाठी लिंबाचे दोन भाग करावेत. यात दोन्ही भागावर सहा-सात लवंगा रोवायच्या. आणि ज्या भागात माश्यांचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्याठिकाणी हे लिंबू ठेवावे.

तुळस

- Advertisement -

अनेकांच्या घरातील अंगणात किंवा खिडकीमध्ये तुळशीचे रोपटे असते. मात्र, जर कोणाच्या घरी तुळशीचे रोपटे नसेल तर ते ठेवावे. कारण तुळशीमुळे हवेतील वातावरण स्वच्छ राहते. तसेच तिच्यात किटकांना दूर ठेवण्याचीही क्षमता असते. त्यामुळे घरात सतत माश्या येत असतील तर तुळशीचे एक रोपटे दारात किंवा खिडकीत ठेवावे.

कापूर

घोंगावणाऱ्या माशांनी त्रस्त असाल तर देवपुजेतील कापूर फायदेशीर ठरेल. घराच्या कोपऱ्यात किंवा खिडकीवर कापराची गोळी ठेवावी. यामुळे माशा घरात येण्यापासून थांबतील.

निलगिरी

निलगिरीच्या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो हवाबंद डब्यात ठेवा. ज्याठिकाणी कीटक किंवा माश्यांचा त्रास जाणवेल, तेथे हा डबा उघडा करून ठेवा.

पुदिना

सुक्या पुदिन्याची पाने वाटून एका कापडात ते गुंडाळून त्याचे छोटे गाठोडे बनवून घरात ठेवावे. याने माश्या घरात येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -