हिमाचल सफारी

उंच बर्फाळ डोंगर, प्रचंड थंडी आणि मन प्रसन्न करणारं वातावरण. हे सारं वातावरण आहे हिमाचलमधील. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून १४ दिवसांची ती हिमाचल ट्रिप म्हणजे लाजवाब. थंड हवेत, सुंदर नयनरम्य डोंगर-दर्‍यांत घालवलेले ते क्षण आजही सुखावतात.

mumbai
हिमाचल

हिमाचलला जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ चंदीगड येथील मोहाली येथे आहे. मुंबई ते चंदीगड हा साधारणत: ३ तासांचा प्रवास. चंदीगडला पोहोचल्यानंतर थोडा वेळ आराम केला. त्यानंतर आसपासचे मॉल्स फिरलो. पंजाबी मार्केट, तिथले ड्रेसेस, अलंकार हे सारं पाहून मन हरखून गेलं.

दुसर्‍या दिवशी ७ तासांचा प्रवास करून आम्ही दलहाउसी येथे पोहोचलो. डोंगर दर्‍यांमधून असलेल्या प्रवासामुळं थकवा येणं साहजिक होतं. पण मन मात्र उत्साही होतं. कारण, पहाटे सूर्योदयाचं दृष्य मनाला शांतता देणारं आणि भारावून टाकणारं असंच. दुसर्‍या दिवशी सकाळीच आमची स्वारी निघाली ती म्हणजे पंचपुळा धबधब्याला. वाटेतच सरदार अजित सिंग यांचे स्मारक आहे. दलहाउसीमध्ये खज्जीयार आहे, ज्याला मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात. सुंदर आणि हिरवेगार असे दृश्य तिथे पाहायला मिळाले. चित्रपटांच्या शुटींगसाठी देखील या ठिकाणाला मोठी पसंती आहे. तेथून प्रवास सुरू झाला तो चंबा या गावाकडे. चंबा हा हिमाचलचा एक जिल्हा आहे. तिथे एक प्राचीन काळी श्री चामुंडा देवी मंदीर आहे. त्या मंदीराच्या परिसातूनच अख्खा चंबा जिल्हा दिसतो.

दुसर्‍या दिवशी धरमशाळेला निघालो. बुद्धीस्ट मोनास्टरी जेथे दलाई लामांचे बसण्याचे स्थान आहे. तिकडे गेल्यावर उत्तम मन शांती लाभते. या ठिकाणी असलेलं प्राचीन हिडिंबा मातेचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून तेथे ज्वाला सुरू आहेत. मग ८ तासांचा प्रवास करून पोहोचलो मनालीला. अगदी सुंदर असं हे ठिकाण. त्यानंतर आमचा प्रवास झाला तो स्नो पॉइंटच्या दिशेनं. रोहतांग पास अख्खा बर्फाने आच्छादलेला प्रदेश. मनाला भारावून टाकणारं द़ृश्य. त्यानंतर आम्ही दुसर्‍या दिवशी सोलंग व्हॅलीला गेलो. रोपवंनं जातानाचा तो अनुभव देखील थरारक असा होता. ९२०० फुटावरून पॅराग्लाइडिंग म्हणजे…

जवळपास ४५० किलोमीटर प्रवास करून शिमल्याला गेलो. शिमल्याला पोहोचताच तेथील गारवा आणि थंडी जाणवू लागली. पहाटे कुफरी येथील हिमालयन नेचर पार्कमध्ये सर्व प्रकारच्या प्राण्यांचे दर्शन झाले. तिथून कुफरी फन वर्ल्ड या थीम पार्क मध्ये गेलो. गो कार्टिंग, राइड्स, लहान असो किंवा मोठे सर्वच येथे मनसोक्त आनंद घेऊ शकतात. हिल रोडवर असलेल्या जॉनीज वॅक्स संग्रहालयामध्ये बर्‍याच व्यक्तीरेखांचे वॅक्सचे पुतळे आहेत जसे की स्टीव जॉब्स, ओबामा, महात्मा गांधी, बॉलीवूडचे सुपरस्टार, हॉलीवूडचे सेलिब्रेटी. याठिकाणी चेरीज, स्ट्रॉबेरीज ताजे मिळतात. हिल रोडवरीचे ख्रिस्त चर्चचा खूप नावलौकीक आहे. १४ दिवसांची ही सफर आजही मनात घर करून आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here