आरोग्यासाठी लाभदायक हिंग

Mumbai
Hing

हिंग हा मसाल्याचा पदार्थ असला तरी त्याचे अनेक फायदे आहेत. हिंगात अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडेंट्स असल्यामुळे अपचन, गॅस आणि पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. हिंग हा जेवणामध्ये विशेष चव वाढवणारा मसाल्याचा पदार्थ आहे. मात्र हे हिंग तेवढ्यापुरते मर्यादित राहिलेले नसून याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. नेमके कोणते आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेऊया.

•पोटात दुखत असल्यास चिमूटभर हिंग घेऊन ते पाण्यात मिसळून प्यावे. त्यामुळे पोटदुखी थांबते. तसेच हिंग पाण्यात भिजवून ते पोटाला लावल्याने आराम मिळतो.

•पोटात गॅस झाला असल्यास हिंग सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय आहे. ताकामध्ये हिंग मिसळून ताक प्यावे. त्यामुळे गॅसपासून आराम मिळतो.

•छातीत कफ झाला असल्यास हिंग पाण्यात घोळून त्याचा लेप तयार करून छातीला लावावा. यामुळे कफ विरघळण्यास मदत होते.

•उचकी थांबत नसल्यास हिंग खाणे फायदेशीर ठरते. हिंगाचे सेवन केल्याने उचकी त्वरीत थांबण्यास मदत होते.

•ढेकर किंवा मळमळ होत असल्यास केळे कुस्करुन त्यात चिमूटभर हिंग टाकून त्या केळ्याचे सेवन करावे. त्यामुळे मळमळ थांबण्यास मदत होते.