घरलाईफस्टाईलअसे चमकवा घरातील दागिने

असे चमकवा घरातील दागिने

Subscribe

सोने, चांदी, मोत्याचे, खरे खोटे, मुलामा दिलेले कुठलेही दागिने असो, सारेच कायम आकर्षक वाटतात. प्रत्येकीच्या कपाटात दागिन्यांसाठी स्पेशल कप्पा नक्कीच असतो, मुख्यत्वे सोन्याच्या किंवा खड्यांच्या दागिन्यांची खास काळजी घ्यावी लागते. दागिने पॉलिश करण्यापलिकडे या दागिन्यांची चकाकी कायम ठेवणार्‍या घरगुती पद्धतीही आहेत. किचनमधील उपलब्ध वस्तूपासून हे काम सहज करता येऊ शकते.

* काळे पडलेले दागिने टूथपेस्टने घासावेत व थंड पाण्याने धुवून घ्यावेत, त्यांच्या चकाकीमध्ये नक्कीच फरक पडलेला दिसेल.

- Advertisement -

* कुठल्याही डिटर्जन्ट पावडरमध्ये पाव चमचा हळद मिसळून, या मिश्रणात दागिने पाच मिनिटं बुडवून ठेवावेत. त्यानंतर थोड्या वेळाने हे दागिने स्वच्छ घासून घ्यावेत व थंड पाण्याने धुवावेत.

* उकडलेल्या बटाट्याचे पाणी वापरुनही दागिने स्वच्छ करता येतात.

- Advertisement -

* रिठे उकळवून, त्याचे पाणी गाळून घ्यावे. त्या पाण्यामध्ये पाच मिनिटं दागिने बुडवून ठेवावेत. त्यानंतर, स्वच्छ चोळून दागिने धुवून घ्यावेत.

* पालेभाज्या शिजवल्यावर उरलेल्या थंड पाण्यात दागिने बुडवून ठेवावेत व थोड्यावेळाने ब्रशने हलकेच घासून घ्यावेत. पालेभाज्यांमधील लोहतत्वामुळे ते स्वच्छ होतात.

* सोन्याचे दागिने मलमल किंवा कुठल्याही मऊ कापडात गुंडाळून ठेवावेत.

* नाजूक दागिने झोपतानाशक्यतो घालू नयेत. ते वाकडे होऊन तुटण्याची शक्यता असते. तसेच, दागिने वापरुन झाल्यावर कापसाने पुसून घ्यावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -