रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या घरगुती टिप्स

Mumbai
home remedies and immunity based tips by ministry of ayush
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या घरगुती टिप्स

देशात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती अधिक चांगली असणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती आणि सोप्या टिप्स दिल्या आहेत.

कोमट पाणी प्यावे

संपूर्ण दिवसभरात ज्या-ज्या वेळी पाणी प्याल त्यावेळी ते पाणी कोमट करुन मग प्यावे.

योगासने

दररोज दिवसांतून कमीत कमी ३० मिनिटं तरी योगासनं, प्राणायम, ध्यान-धारणा आवश्यक करावी.

या पदार्थांचा वापर करा

दररोजच्या जेवणात हळद, जीरं, धणे, लसूण या पदार्थांचा समावेश जरुर करा.

च्यवनप्राशचे सेवन करा

दररोज सकाळी उठल्यावर एक चमचा च्यवनप्राश खाऊन दिवसाची सुरुवात करा. तसेच ज्या लोकांना मधुमेधाची समस्या आहे, त्या लोकांनी शुगर
फ्री च्यवनप्राश खावे.

हर्बल टी घ्यावे

हर्बल टी किंवा काढा प्यावा. हा काढा बनवण्यासाठी तुळस, दालचिनी, काळी मिरी, आलं, मनुका पाण्यात एकत्र उकळवून, त्यानंतर ते गाळून हा काढा प्यावा.

हळद घातलेलं दूध

दररोज रात्री झोपताना हळदीच्या दुधाचे सेवन करावे.

नाकपुड्यांमध्ये तेल सोडावे

तिळ किंवा नारळाचं तेल किंवा देशी तूपाचे दोन थेंब नाकपुड्यांमध्ये टाकावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here