घरलाईफस्टाईल'हे' केल्याने ब्लॅक अंडरआर्म्स होतात दूर

‘हे’ केल्याने ब्लॅक अंडरआर्म्स होतात दूर

Subscribe

काळे अंडरआर्म्स ही समस्या महागडे प्रॉडक्ट्स वापरुन देखील काही वेळा दूर होत नाही. मात्र यावर घरगुती उपाय केल्यास तुमची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकेल.

तरुणींकरता ब्लॅक अंडरआर्म्सस ही एक मोठी समस्या आहे. ब्लॅक अंडरआर्म्सस असल्यामुळे तरुणी स्लीवलेस ड्रेस घालणे शक्यतो टाळतात. मात्र आता या समस्येवर तुम्ही काही घरगुती उपायांनी घरच्याघरी निदान करु शकता आणि तुम्हाला हवी असलेली फॅशन करु शकता. चला तर जाणून घेऊया ब्लॅक अंडरआर्म्सवर काही घरगुती उपाय…

बटाटा

अंडरआर्म्ससवर बटाटा हा एक रामबाण उपाय आहे. बटाटा हा ब्लीचिंगचे काम करतो. काळे अंडरआर्म्सस झाले असल्यास त्यावर बटाट्याने स्क्रब केल्याने काळे डाग दूर होण्यास मदत होते.

- Advertisement -

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट अंडरआर्म्ससवर लावल्याने डार्कनेस कमी होतो. तसेच लवकर फरक हवा असल्यास पाण्याऐवजी गुलाब पाण्याचा वापर करावा.

दूध

दूध हे क्लिंजिंग प्रमाणे काम करते. दूधामध्ये केशर मिसळून हे मिश्रण ब्लॅक अंडरआर्म्ससवर लावल्याने डार्कनेस कमी होतो.

- Advertisement -

खोबरेल तेल

खोबरेल तेलात लिंबाचा रस आणि थोडेसे दही एकत्र करुन याचे मिश्रण अंडरआर्म्ससवर लावावे. यामुळे काळपटपणा दूर होऊन तेथील त्वचा क्लिन होते.

चंदन

चंदनाची पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करुन त्याची तयार पेस्ट अंडरआर्म्ससवर लावावी. त्यानंतर ८ ते १० मिनिटांनी स्वच्छ करुन घ्यावे यामुळे काळे डाग दूर होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -