घरलाईफस्टाईललांब-दाट केसांसाठी तयार करा तेल

लांब-दाट केसांसाठी तयार करा तेल

Subscribe

अनेक तरुणींना वाटते की, आपले केस लांब-दाट असावे. याकरता अनेक तरुणी वेगवेगळे उपाय देखील करत असतात. मात्र, तरी त्यांचे केस काही लांब आणि दाट होत नाही, अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास तुमचे केस लांब आणि दाट होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया केस लांब सडक होण्यासाठी काय करावे.

नारळाचं तेल आणि कढी पत्ता

- Advertisement -

स्वयंपाकघरात नारळाचे तेल आणि कढीपत्ता हा असतोस. त्याचाच वापर करुन तुम्ही तेल बनवू शकता. याकरता मूठभर कढीपत्ता घ्यावा. कढी पत्ता यात बीटा-कॅरोटीन आणि प्रथिनं मुबलक प्रमाणात असतात. जे केसाच्या वाढीस मदत करते.

यामधील असलेल्या पोषक घटकांमध्ये अँटी ऑक्सीडेन्ट आणि अमिनो ऍसिड केसांना पातळ होण्यापासून रोखतात आणि केसांचे मूळ घट्ट होण्यास मदत करतात. यामुळे केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळते.
याकरता मूठभर कढीपत्ता घ्या आणि त्यांना काही दिवसांसाठी उन्हात वाळवून घ्या. आता या वाळक्या पानांना १०० मिली. नारळाच्या तेलात उकळवून घ्या. या तेलाला थंड होऊ द्या, गाळून बाटलीत भरून घ्या. आता या तेलाने मालिश करा. या तेलाने तुमचे केस वाढण्यास नक्की मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -