घरलाईफस्टाईलघरगुती उपचारांचा बटवा

घरगुती उपचारांचा बटवा

Subscribe

घरच्या घरी छोट्या मोठ्या आजारांवर घरगुती उपाय

माणसाला नेहमीच शरीराच्या कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागते. तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांनाच कधी हिरड्या दपखणे, गालगुंड येणे, संधिवात, हाडांचे दुखणे आणि इतर समस्या उद्भवतात. अशा आजारावेळी आपण त्वरित डॉक्टरकडे जातो. मात्र, काही असे उपाय असतात जे तुम्ही घरच्या घरी देखील करुन आपले आरोग्य चांगले जपू शकता. चला तर जाणून घेऊया काही घरगुती उपाय.

हिरड्या फुगल्यास

- Advertisement -

मोरावळा (मोठा आवळा) घेऊन त्याचे तुकडे करावेत आणि ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी. यामुळे हिरड्यांना आराम मिळतो.

- Advertisement -

गालगुंड

गालगुंड आल्यास उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करुनही तो निघत नाही.

चेहरा धुण्यासाठी

५ चमचे दूध घेऊन त्यात २ थेंब लिंबाचा रस घालून १ तास ठेवावे. तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या या मिश्रणाचा १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा करावा. यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते.

मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी

लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त १ मिनिटच ठेवावे आणि नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे. यामुळे मानेवरील दागिन्यांचे डाग जाण्यास मदत होते.

संधिवात आणि हाडांचे दुखणे

पांढऱ्या तिळाचे २ चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या करुन खाव्या. यामुळे स्पाँडिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी आणि सांधेदुखी जाते.

स्पाँडिलिटिस आणि मणक्यांचे विकार

काळ्या खारकांची २ चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यानंतर त्यात १ चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे १५ दिवसात मणक्यातील गॅप भरुन येते.

टकलावर केस येण्यासाठी

सकाळी आंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चुरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्यावा. हा प्रयोग २ महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते.

केसगळती

कांद्याचा रस रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केसगळती थांबते.

झोपेत घोरण्याची समस्या

तूप गरम करुन कोमट करावे आणि त्याचा ११ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. हा प्रयोग सलग १५ दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते.

माथा उठणे

गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे आणि ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत ते गरम करावे. त्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -