घरलाईफस्टाईल'असा' दूर करा चेहऱ्यावरील तेलकटपणा

‘असा’ दूर करा चेहऱ्यावरील तेलकटपणा

Subscribe

चेहऱ्यावरील तेलकटपणा कसा दूर करावा.

बऱ्याचदा काय होते, अनेकांचा चेहरा तेलकट असतो. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पुरळ येणे. मेकअप निघून जाणे, चेहरा तेलकट दिसणे अशा समस्या जाणवू लागतात. मात्र, या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी देखील काही उपाय करु शकतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा तेलकटपणा दूर होण्यास मदत होईल.

मध

- Advertisement -

चेहरा तेलकट असल्यास त्यावर मध एक रामबाण उपाय आहे. याकरता चेहऱ्यावर मध लावून चेहरा १०-१५ मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. यामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल.

टोमॅटो

- Advertisement -

टोमॅटोमध्ये सॅलिसालिक अॅसिड असते. जे आपल्या तेलकट त्वचेमधील तेल शोषून घेण्यास मदत करते. यासाठी टोमॅटो घेऊन तो मिक्सरमध्ये बारीक करुन त्यात १ चमचा साखर मिसळा. हे तयार मिश्रण चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल.

कोरफड जेल

चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. याकरता चेहऱ्यावर रात्री झोपताना चेहऱ्यावर कोरफडचा जेल लावा आणि रात्रभर तसेच राहूद्या. सकाळी उठल्यानंतर तुमच्या चेहऱ्यात फरक जाणवेल.

बेसन पीठ

तेलकट चेहऱ्याकरता बेसन पीठ एक रामबाण उपाय आहे. याकरता बेसन पिठात थोडे पाणी मिसळून ते चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होण्यास मदत होईल.

गुलाब पाणी

गुलाबाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स, अँटीमाइक्रोबियल आणि जीवनसत्ते असतात. त्यामुळे चेहऱ्याकरता गुलाब पाणी एक चांगला उपाय आहे. खास करुन त्वचा तेलकट असेल तर आपला चेहरा साफ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -