घरलाईफस्टाईलतुम्हालाही येत आहे 'स्ट्रेस'?

तुम्हालाही येत आहे ‘स्ट्रेस’?

Subscribe

सध्याच्या धावपळीच्या युगात आणि सतत बदलणाऱ्या जीवनशैलीचा परिणाम थेट माणसाच्या आयुषायावर होत असतो. नोकरी, काम, प्रवास या सर्व गोष्टींमुळे माणसाला थकवा, तणाव अधिक जाणवू लागतो. परिणामी या सर्व गोष्टींमुळे प्रत्येक व्यक्तीला ‘स्ट्रेस’ येतो. परंतु, अशावेळी आपण काय खातो हे देखील महत्त्वाचे असते. कधीकधी खाण्याच्या पदार्थांनी देखील स्ट्रेस वाढण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया स्ट्रेस आल्यास कोणत्या पदार्थांना दूर ठेवणे गरजेचे आहे.

चहा

- Advertisement -

बऱ्याचदा आपल्याला थकवा आला की, आपण चहा किंवा कॉफिचे सेवन करतो. यामुळे आपल्याला झोप देखील येत नाही. त्यामुळे स्ट्रेस आल्यास चहा, कॉफी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी यांना दूरच ठेवले पाहिजे.

गोड पदार्थ

- Advertisement -

स्ट्रेसमध्ये व्यक्तीची शुगर आधीच वाढलेली असते. अशा परिस्थितीत तुम्ही अधिक गोड खाल्ले तर स्ट्रेस अधिक वाढतो. त्यामुळे चिडचिडेपणा अधिक वाढतो.

मीठ

जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त मिठाचे सेवन करत असाल तर तुमच्यासाठी ते घातक ठरु शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढू शकतो. तसेच उच्च रक्तदाबाची समस्या देखील निर्माण होऊ शकते.

अल्कोहोल

मद्यसेवन केल्याने विचार करण्याची क्षमता कमी होते. त्याच्या सेवनाने अॅड्रेनलाईन हार्मोन निर्माण होतात आणि स्ट्रेस वाढतो. त्यामुळे स्ट्रेस कमी करायचा असल्यास अल्कोहोल सेवन करणे टाळा.

फास्ट फूड

जंक फूडमध्ये प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असते. जर तुम्हाला स्ट्रेस असेल, तर असे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.


हेही वाचा – नाश्तामध्ये ‘या’ फळांचा करा समावेश


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -