अचानक ब्लड प्रेशर कमी झाल्यास ‘या’ पदार्थांचे करा सेवन

बीपी लो होण्याची समस्या उद्भवू शकते. अशावेळी नेमके काय करावे?

home remedies to deal with the problem of low blood pressure
अचानक ब्लड प्रेशर कमी झाल्यास 'या' पदार्थांचे करा सेवन

ब्लड प्रेशर हा कधीही आणि कुठेही कमी होऊ शकतो. मानसिक ताणतणाव, डोक्यात असणारे अनेक विचार, सततचा प्रवास, जीवघेणी धावपळ यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊन बीपी लो होण्याची समस्या उद्भवू शकते. अशावेळी नेमके काय करावे? असा देखील प्रश्न पडतो. मात्र, काही पदार्थांचे सेवन केल्यास ब्लड प्रेशन नॉर्मल होण्यास मदत होते.

लिंबू पाणी

तुम्हाला जर जाणवले आपला बीपी लो झाला आहे, अशावेळी लगेच लिंबूपाण्याचे सेवन करावे. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित होण्यास मदत होईल.

मीठ आणि साखरेचे पाणी

ज्या व्यक्तींना लो ब्लड प्रेशरचा त्रास आहे, अशा व्यक्तींने कुठेही प्रवासात जाताना आपल्या सोबत मीठ आणि साखर ठेवावी. बीपी लो झाल्यासारखे वाटल्यास पाण्यात थोडे मीठ आणि साखर घालून त्याचे सेवन करावे. आराम मिळतो.

कॉफीचे सेवन करावे

बीपी लो झाल्यास कॉफी घ्यावी. कॉफीमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. फक्त अवेळी जास्त प्रमाणात घेऊ नये.

चॉकलेट किंवा खडीसाखर घ्यावी

अचानक रक्तदाब कमी झाल्यास पटकन एखाद्या गोड पदार्थाचे सेवन करावे. यामध्ये चॉकलेट, खडीसाखर किंवा एखादी गोळी खावी. यामुळे आराम मिळतो.

तुळस

तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात. लो ब्लड प्रेशरवर तुळस उपयुक्त ठरते. तुळशीची १०-१५ पाने खाल्ल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो.