घरलाईफस्टाईलअशी आणा वेळेच्या 'आधी मासिक पाळी'

अशी आणा वेळेच्या ‘आधी मासिक पाळी’

Subscribe

आजच्या २१ व्या शतकातही मासिक पाळी दरम्यान सार्वजनिक कार्यक्रम, पुजा – अर्चा, लग्नविधी तसेच स्वयंपाकघरापासून महिलांना दूर ठेवले जाते. त्यामुळे अनेकदा स्त्रियांनी सार्वजनिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी त्यांना आपली मासिक पाळी मागे – पुढे करणे भाग पडते. अशावेळी अनेक महिला औषध घेतात मात्र, त्यांनी हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे काही घरगुती उपाय आहेत. ज्यामुळे मासिक पाळी वेळेआधी आण्यासाठी फायदा होतो.

पपई

- Advertisement -

पपई हे गरम प्रकृतीचे फळ असल्याने त्याच्या सेवनाने शरिरात उष्णता तयार होऊन तुम्हाला वेळेच्या आधी मासिक पाळी येण्यास मदत होते. पपईतील ‘कॅरोटीन’ स्त्री शरीरातील ‘इस्ट्रोजन’ नामक हार्मोन्स उत्तेजित करते. त्यामुळे तुमची मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते.

गूळ

- Advertisement -

ग़ुळाच्या सेवनानेदेखील मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते. तुम्ही गूळ तिळाच्या बियांसोबत घेऊ शकता किंवा सकाळी रिकाम्या पोटी ग्लासभर आल्याच्या रसात गुळ घालून घेतल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

गाजर

गाजरामध्ये मुबलक प्रमाणात ‘कॅरोटीन’ असते. याचा आहारात पुरेसा वापर करावा. दिवसातून किमान २-३ वेळेस गाजराचा रस प्या. गाजरातील ‘कॅरोटीन’ शरिरातील ‘इस्ट्रोजन’ना चालना देतात परिणामी मासिक पाळी लवकर येते.

डाळिंब

मासिक पाळी लवकर आणण्यासाठी डाळिंबाचा रस दिवसातून तीनदा घ्या. यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत होईल.

उसाचा रस

उसाच्या सेवनाने देखील मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -