घरलाईफस्टाईलफूड पॉयझनिंग झाल्यास, करा घरगुती उपाय

फूड पॉयझनिंग झाल्यास, करा घरगुती उपाय

Subscribe

फूड पॉयझनिंग झाल्यानंतर तेलकट खाणं टाळा आणि त्याचप्रमाणं डेअरी उत्पादन, कॅफीन आणि दारू यापासूनदेखील दूर राहा. काय आहेत हे घरगुती उपाय? खास तुमच्यासाठी.

बऱ्याचदा काही वेगळं अथवा रस्त्यावरचा पदार्थ खाल्ल्यानं फूड पॉयझनिंग होतं. अशावेळी ज्या व्यक्तीला त्रास होतो ती व्यक्ती आणि आजूबाजूची माणसंही पॅनिक होतात. डॉक्टरकडे जाण्याआधी यावर काही घरगुती उपाय करता येतात जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही हे उपाय घरच्या घरी केल्यास तुम्हाला तात्काळ बरं वाटू शकतं आणि डॉक्टरच्या फेऱ्या मारणंही कमी होऊ शकतं. तसंच फूड पॉयझनिंग झाल्यानंतर तेलकट खाणं टाळा आणि त्याचप्रमाणं डेअरी उत्पादन, कॅफीन आणि दारू यापासूनदेखील दूर राहा. सतत पाणी पित राहणं गरजेचं आहे. काय आहेत हे घरगुती उपाय? खास तुमच्यासाठी.

लसूण – लसणात अँटी व्हायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल हे गुण असतात. यामुळं डायरिया आणि पोटदुखीपासून लगेच आराम मिळतो. एक- दोन लसणीच्या पाकळ्या खाल्ल्यानंतर एक ग्लास गरम पाणी प्यायलास त्वरीत आराम मिळतो. तुम्हाला हवं असल्यास, पाण्यात लसूण टाकून उकळून घेऊ शकता आणि दिवसभर हे पाणी पिऊ शकता.
अॅप्पल व्हिनेगर – अॅप्पल व्हिनेगरमध्ये असणाऱ्या अॅसिडमुळं जळजळ कमी होते आणि लगेच आराम मिळतो. दोन चमचा अॅप्पल व्हिनेगर एक ग्लास गरम पाण्यात घालून घ्यावं आणि खाण्यापूर्वी हे ग्लासभर पाणी प्यावं.
लिंबू पाणी – लिंबू पाण्यामुळं पोटात इन्फेक्शन वाढवणारे बॅक्टेरिया कमी होतात. तसंच आपलं पचनतंत्र व्यवस्थित राखण्यासाठी लिंबू पाणी रोज प्यायल्यास चांगलं असतं. चिमूटभर साखर लिंबू पाण्यात मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावं. यामुळं फूड पॉयझनिंग कमी होतं.
मध – मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल असतं. मधामुळं अॅसिडिटी कमी होत आणि फूड पॉयझिनिंगपासून आराम मिळतो. एक चमचा मध दिवसभरातून किमान तीन वेळा घ्यावं. त्यामुळं शरीरात अॅसिड बनत नाही आणि पोटाला आराम मिळतो.
तुळस – तुळशीनं पोटदुखीच्या समस्यांपासून सुटका होते आणि फूड पॉयझनिंगदेखील दूर होतं. यामधील अँटी मायक्रोबियल गुणामुळं पोटातील कोणताही बॅक्टेरिया मारून टाकण्याचं काम तुळस करते. दोन – तीन कप पाण्यात ताजी तुळशीची पानं टाकून उकळून घ्यावं. हे पाणी थंड झाल्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावं.
संत्र्याचा रस – संत्र्यांच्या ताज्या रसामध्ये जास्त प्रमाणात मिनरल, विटामिन आणि पोषक तत्व असतात. त्यामुळं तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि पोटासाठी उपयुक्त असतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -