घरलाईफस्टाईलकेसांच्या समस्यांवर आयुर्वेदिक तेल

केसांच्या समस्यांवर आयुर्वेदिक तेल

Subscribe

आयुर्वेदिक तेल

हिवाळ्यात त्वचा जशी कोरडी होते तसे केस देखील कोरडे होतात. तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबत केसांचीही विशेष काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात केसांच्या सर्व समस्यांवर एक रामबाण असा उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया घरगुती तेल कसे तयार करायचे.

साहित्य

- Advertisement -

२५ ग्रॅम ब्राह्मी पावडर
२५ ग्रॅम आवळा पावडर
२५ ग्रॅम भृंगराज पावडर
२५ ग्रॅम जटामांसी पावडर
२५ ग्रॅम नागरमोथा पावडर
कांद्याचा रस २ किंवा ३ चमचे
मेहंदी आणि मेथीच्या दाण्यांची पेस्ट
कढीपत्ता
एरंडेल तेल
नारळाचे तेल
तिळाचे तेल

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम एका लोखंडी भांड्यात वरील सर्व साहित्य एकजीव करा. त्यामध्ये पाणी टाकून ते चांगल्या प्रकारे दोन दिवस भिजत ठेवा. आता या मिश्रणात एरंडेल तेल, नारळाचे तेल आणि तिळाचे तेल घालून हलक्या आचेवर शिजवा. जेव्हा पाणी आटून खाली फक्त तेल शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करा. आता या मिश्रणाला गाळा आणि कोणत्याही हवाबंद बाटली मध्ये भरून ठेवा. दररोज झोपण्यापूर्वी हे तेल कोमट करून लावल्यामुळे केसांच्या समस्या दूर होतील. सोबतच केस घनदाट आणि आकर्षक होण्यासही मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -