घरलाईफस्टाईलडोकेदुखीवर घरगुती उपाय

डोकेदुखीवर घरगुती उपाय

Subscribe

डोके दुखत असल्यास हे घरगुती उपाय केल्यास डोके दुखी त्वरित थांबते

डोके दुखी हा प्रत्येक व्यक्तीचा एक कॉमन प्रॉब्लम आहे. डोके दुखण्याची बरीच कारण असतात. जसे डोळ्यांची समस्या, सायनास, मासिक धर्म, मानसिक तणाव आणि उशीरा रात्रीपर्यंत जागणे या सर्व कारणांमुळे डोकेदुखी उद्भवते. मात्र काही घरगुती उपाय केल्यास डोके दुखी थांबते.

  • गरम पाण्यात लिंबाचा रस घालून ते पाणी प्यायल्याने डोके दुखी थांबते. जर गॅस झाल्यामुळे डोकं दुखत असल्यास डोके दुखी त्वरित थांबते.
  • लवंगांत थोडे मीठ मिसळून त्याची पावडर तयार करुन घ्यावे. डोकं दुखायला लागल्यावर कच्च्या दुधात ही पावडर मिसळून ही तयार झालेली पेस्ट डोक्यावर लावावी. यामुळे डोकं दुखी थांबते.
  • युकेलिप्टलच्या तेलाने डोक्याची मॉलिश केल्यास डोके दुखी थांबण्यास मदत होते.
  • दररोज डोक दुखत असल्यास दररोज एक ग्लास गायीच्या दुधाचे सेवन करावे. यामुळे आराम मिळतो.
  • गरमीमुळे डोक दुखत असल्यास चंदन पावडरची पेस्ट तयार करुन डोक्याला लावल्याने आराम मिळतो.
  • नारळाच्या तेलाने २० मिनिटे डोक्याला मसाज केल्याने देखील डोकं दुखी दूर होते.
  • डोकं दुखत असल्यास एक लसूण पाकळी खाल्ल्याने आराम मिळतो.
  • नेहमी डोकं दुखत असेल तर सफरचंदावर मीठ लावून खायल्याने आराम मिळतो. त्यानंतर गरम पाणी किमवा दुधाचे सेवन केले पाहिजे. यामुळे डोकेदुखीची समस्या दूर होते.
  • सर्दीमुळे डोकेदुखी होत असल्यास धणेपूड आणि साखरेचा घोळ तयार करुन त्याचे सेवन केल्याने फायदा होतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -