घरलाईफस्टाईलहॉटेल घाटी अस्सल गावरान

हॉटेल घाटी अस्सल गावरान

Subscribe

विविधतेने नटलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील निरनिराळ्या संस्कृतीची आणि निरनिराळ्या चवीची माणसे मुंबईत येतात आणि स्थायिक होतात. प्रत्येक बाबतीत विभिन्नतेने नटलेल्या महाराष्ट्राचा एक भाग असलेला प्रदेश म्हणजे पश्चिम महाराष्ट्र.या प्रदेशाच्या पदार्थांना एक वेगळी चव आहे.एक वेगळे महत्त्व आहे आणि हे महत्व अधोरेखित करून पुणे आणि सातार्‍याच्या दोन तरूणांनी ‘हॉटेल घाटी’ नावाची एक संकल्पना तयार केली आणि ती प्रत्यक्षातही उतरवली आहे.

मुंबईत गल्लीबोळात तुम्हाला अनेक छोटी-छोटी हॉटेल्स दिसतील.वडा-सांबारपासून समोशांसारखे पदार्थ या हॉटेल्समध्ये मिळतात.जास्तीत जास्त हॉटेल्समध्ये काही सामायिक पदार्थ तुम्हाला पहायला मिळतील.परंतु,आजकाल क्षेत्र कुठलेही असो,युवा पिढी नवनव्या संकल्पना घेऊन काही तरी नवीन करायचा प्रयत्न करत असते.मुंबई हे देशातील एक मोठे शहर देशाच्या कानाकोपर्‍यातून येथे अनेक लोक येतातच पण विविधतेने नटलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील निरनिराळ्या संस्कृतीची आणि निरनिराळ्या चवीची माणसे मुंबईत येतात आणि स्थायिक होतात. प्रत्येक बाबतीत विभिन्नतेने नटलेल्या महाराष्ट्राचा एक भाग असलेला प्रदेश म्हणजे पश्चिम महाराष्ट्र.या प्रदेशाच्या पदार्थांना एक वेगळी चव आहे.एक वेगळे महत्त्व आहे आणि हे महत्व अधोरेखित करून पुणे आणि सातार्‍याच्या दोन तरूणांनी ‘हॉटेल घाटी’ नावाची एक संकल्पना तयार केली आणि ती प्रत्यक्षातही उतरवली आहे.

प्रभादेवीच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदीरापासून हाकेच्या अंतरावर हे हॉटेल आहे. काही चौरस मीटरच्या जागेत हे हॉटेल असले तरी खाणार व्यवस्थित बसून खाऊ शकतो अशी हॉटेलची रचना आहे. भिंतीवर सातारा,सांगली आणि पुणे अशी रेल्वेसारखी बोर्ड टांगण्यात आली आहेत.जी तुम्हाला तेथे घेऊन जातील. पदार्थांना गावची अस्सल असते की खाणार काही क्षण गावच्या विश्वात जातो.हॉटेलमध्ये नाष्ठ्याचे पदार्थ मिळतात.परंतु,घाटी थाळी हे या संकल्पनेचे मूळ आहे.घाटी थाळी,स्पेशल घाटी थाळी हे मिळणारे खास पदार्थ आहेत.

- Advertisement -

घाटी थाळीमध्ये घाटी चिकन,तीन चपात्या किंवा एक भाकरी,सोबत अस्सल घाटी बोंबिल ठेचा,भात, ग्रेवी आणि कोशिंबीराचा समावेश असतो तर स्पेशल थाळीमध्ये चिकन किंवा मटण,तांबडा-पांढरा रस्सा,2 भाकर्‍या किंवा 4 चपात्या,एक अंडे आणि बोंबिल ठेचा असतो.घाटी थाळी 180 तर स्पेशल घाटी थाळी 220 रूपयांना मिळते.400 रूपयांत दोन माणसे भरपेट जेवू शकतात.याशिवाय घाटी बोनलेस थाळी आणि माशांच्या आणि राईसच्या इतर रेसिपी देखील हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत.पाककृतीसाठी लागणारे मसाले गावावरूनच आणले जातात.त्यामुळे अस्सल गावरान चव टिकून राहते.

कसं जायचं ? दादर स्थानकात उतरल्यावर सिद्धीविनायक मंदिराच्या दिशेने,आगर बाजार,दादर (पश्चिम )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -