घरलाईफस्टाईलघरगुती क्लिनर्स अगदी बाजारासारखे आणि हे पदार्थ खाल्ले असतील तर त्यावर दूध...

घरगुती क्लिनर्स अगदी बाजारासारखे आणि हे पदार्थ खाल्ले असतील तर त्यावर दूध पिऊ नका

Subscribe

घरगुती क्लिनर्स अगदी बाजारासारखे

घरामध्ये साफसफाई करण्यासाठी आपण निरनिरळ्या क्लिनर्सचा वापर करीत असतो. घर आणि घरातील वस्तू निर्जंतुक व्हाव्यात याकरिता मुख्यत्वे या क्लिनर्सचा वापर केला जात असतो. पण साफसफाई करण्याकरिता केवळ एकच क्लिनर असून काम भागत नाही. काचेच्या वस्तू पुसण्यासाठी एक क्लिनर, लाकडी सामानासाठी दुसरा, तर बाथरूम्स, घरातील फरशी ह्यांच्याकरिता देखील वेगवेगळ्या क्लिनर्सचा वापर आपण करीत असतो. ह्यासाठी आपले पुष्कळसे पैसेही खर्च होत असतात. त्यामुळे पैशांची बचत करून, तितकीच उत्तम सफाई देणारे काही क्लिनर्स आपण घरच्याघरी देखील तयार करू शकतो.

एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात मिसळून हे मिश्रण स्टेनलेस स्टीलच्या वस्तू साफ करण्यासाठी वापरता येते. आजकाल फ्रीज, ओव्हन, टोस्टर, इत्यादी वस्तू स्टेनलेस स्टील फिनिशमध्ये जास्त पसंत केल्या जात आहेत. ह्या वस्तू हाताळताना ह्यावर हातांचे ठसे उमटत असतात किंवा इतरही डाग पडत असतात. हे सर्व डाग घालवून स्टेनलेस स्टील चमकविण्याच्या कामी पाणी आणि व्हिनेगरचे मिश्रण सहाय्यक आहे. बाथरूम, किचनमधील नळ, किचनमधील सिंक चमकविण्यासही हे मिश्रण सहाय्यक आहे. मात्र व्हिनेगर अ‍ॅसिडिक असल्यामुळे ग्रेनाईट किंवा संगमरवरी ओट्यावर वापरू नये.

- Advertisement -

हे पदार्थ खाल्ले असतील तर त्यावर दूध पिऊ नका

1 तीळ आणि मीठ – तीळ आणि मिठाने तयार पदार्थ खात असला तर यानंतर दूध पिऊ नये. किमान दोन तासांचे अंतर असू द्या.

2 उडदाची डाळ – उडदाची डाळ खाल्ली असल्यास दुधाचे सेवन केल्याने आरोग्यसंबंधी समस्या उद्भवू शकतात. यात किमान दोन तासांचे अंतर असावे.

- Advertisement -

3 सायट्रिक फळ – आंबट फळांचे सेवन केल्यावर दूध पिणे हानीकारक आहे. म्हणून यात अंतर असणे आवश्यक आहे.

4 मासे – मासे खाण्याचे शौकिन असल्यास यानंतर लगेच दूध पिणे टाळावे. याने फूड पॉयजनिंग आणि पोटासंबंधी आजार होऊ शकतात.

५ मांस – कोंबडी अथवा बकर्‍याचे मांस खाल्ल्यावर दूध पिणे हे आरोग्याला हानीकारक आहे. त्यामुळे त्वचेचे विकार होऊ शकतात.

६ दही – दही खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करणे टाळावे. याने पचन विकार आणि पोटासंबंधी आजार होऊ शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -