घरलाईफस्टाईलहिवाळ्यात घ्या अशी काळजी

हिवाळ्यात घ्या अशी काळजी

Subscribe

हिवाळ्यात घ्यावयाची काळजी

सध्या हिवाळ्याची तीव्रता हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली आहे. हा ऋतू आरोग्यदायी असला तरी प्रकृतीची काळजी घेण्याचीही तितकीच गरज असते. त्यामुळे हिवाळ्याचा आनंद अधिक लुटता येईल.

सुका मेवा

- Advertisement -

हिवाळ्यामध्ये काही प्रमाणात तरी सुका मेवा खावा. त्यामुळे शरीराला पौष्टिक घटक, उष्णता मिळते.

- Advertisement -

दूध प्यावे

दररोज रात्री झोपताना किमान १ ग्लास दूध प्यावे. त्यामुळे झोपही शांत लागण्यास मदत होते.

कडधान्याचे सेवन करावे

हिवाळ्याच्या दिवसात जेवणामध्ये कडधान्याचा समावेश करावा. आहारात मूग, चणे आदी कडधान्यांना प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे, ताजी फळे, सॅलडचे प्रमाण वाढवावे.

पाणी अधिक प्यावे

हिवाळ्यात तहान कमी लागते. मात्र, असे असताना देखील हिवाळ्यात पाणी अधिक प्रमाणात प्यावे. दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.

ओठांची काळजी घ्यावी

थंडीमध्ये ओठ रुक्ष, सुखे पडून रक्तही येते. त्यासाठी ओठांना तूप लावावे. रोज बाहेर जाताना, ओठांना व्यासलीन लावावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -