घरलाईफस्टाईलअॅलर्जीचा खोकला

अॅलर्जीचा खोकला

Subscribe

अॅलर्जीचा खोकला म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आणि त्याला कसे हाताळावे याविषयी घ्या जाणून.

सतत खोकला येणे त्रासदायक असते आणि त्यामुळे तुम्हाला शांतता मिळत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला अॅलर्जीमुळे खोकला येत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेणे आणि या खोकल्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अॅलर्जीचा खोकला म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आणि त्याला कसे हाताळावे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

घशातील कफ आणि बाह्य कण काढून टाकण्यासाठी खोकला ही शरीराची प्रतिक्षिप्त क्रिया असते. घसा मोकळा करण्यासाठी खोकणे ही वारंवार घडणारी क्रिया नाही. पण खोकल्याची उबळ वारंवार येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे बहुतेक प्रकारचा खोकला १५ दिवसांत थांबतो किंवा कमी होतो. पण तुम्हाला खोकल्यामुळे मध्येच झोपेतून जाग येत असेल किंवा तुम्हाला महत्त्वाची मीटिंग टाळावी लागत असेल तर सावधान व्हा. त्याचप्रमाणे तुम्हाला तो अॅलर्जीचा खोकला वाटत असेल तर वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे. या खोकल्याची लक्षणे आणि यासाठी असलेल्या उपचारांची माहिती जाणून घेऊया. मात्र, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

- Advertisement -

अॅलर्जीचा खोकला म्हणजे काय?

अॅलर्जीच्या खोकल्याचा तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. साध्या सर्दीमुळे होणाऱ्या खोकल्याला अॅलर्जीचा खोकला म्हणतात. खोकल्यासोबत सर्दीही होत असल्याचे तुमच्या लक्षात येत असेल आणि नाक चोंदण्याचे प्रकारही घडू शकतात. साधी सर्दी झाल्यावर किंवा अॅलर्जीची रिअॅक्शन म्हणून सर्दी-खोकला होत असल्याचे निरीक्षण करत असाल. याची कारणे नेमकी कळत नसल्यामुळे त्यांचे निदान करणे आणि हाताळणे कठीण होऊ शकते. त्याचप्रमाणे अॅलर्जीचा खोकला झालेल्या व्यक्ती चुकीची औषधे घेतात आणि वेळेत योग्य उपचार करून घेत नाहीत.

खोकल्याची कारणे?

तुमच्या शरीरात जाणाऱ्या बाह्य घटकांवर प्रतिक्रिया म्हणून अतिक्रियाशील प्रतिकारक यंत्रणांमुळे अॅलर्जीचा खोकला उद्भवतो. जेव्हा शरीर निरुपद्रवी बाह्य घटकांना उपद्रवी समजते आणि त्यांच्याशी लढा देण्यासाठी संरक्षण यंत्रणा उभी करते तेव्हा अॅलर्जीचा खोकला होतो. अशा परिस्थितीत शरीरातून हिस्टामाइन या रसायनाचा स्त्राव होतो. सर्दी झालेल्या रुग्णाच्या शरीरातून हिस्टामाइन स्त्रवते. नाक वाहणे, खोकला, शिंका आणि नाकपुड्यांमध्ये सूज येण्यासाठी हिस्टामाइन कारणीभूत असते. त्यामुळे सर्दी झालेली नसूनही त्या रुग्णाला सर्दी झाल्यासारखे वाटू शकते. अशावेळी अॅलर्जीचा खोकला समजून येतो. या खोकल्यासाठी निश्चित असे कारण नाही. पण काही जणांना इतरांच्या तुलनेने अशा प्रकारचा खोकला अधिक प्रमाणात होतो. अॅलर्जींची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्यांना असा खोकला होण्याची शक्यता अधिक असते. आई किंवा वडील यांच्यापैकी एक जरी अॅलर्जिक असेल तरी मुलामध्ये अॅलर्जी होऊ शकते, असे अनेक संशोधनाअंती आढळून आले आहे. त्याचप्रमाणे बाह्य घटकांमुळेही अॅलर्जीचा खोकला होऊ शकतो. तीव्र परागीकरणाचा हंगाम किंवा बुरशीयुक्त वातावरणात गेल्यावर खोकल्याची उबळ येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या खोकल्याच्या उबळीकडे लक्ष ठेवा. त्याचप्रमाणे परागीकरण, बुरशी, धुळ, हवेचे प्रदूषण आणि पॅसिव्ह स्मोकिंगमुळेही अशा प्रकारचा खोकला येऊ शकतो. तुम्हाला हे फीव्हर (धूळ, परागकण यामुळे होणारी अॅलर्जी), अप्पर एअरवे कफ सिन्ड्रोम आणि गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीज (जीईआरडी) असेल तर अॅलर्जीचा खोकला होण्याची शक्यता असते. अॅलर्जीच्या खोकल्यासोबत सायनस आणि मध्यकर्णाचा संसर्ग होऊ शकतो.

- Advertisement -

लक्षणे

एखाद्याला कोरडा खोकला होतो किंवा खोकल्यासोबत कफही बाहेर पडतो आणि पोलन सीझनमध्ये किंवा प्राणी असतील तर ही लक्षणे अधिक दिसून येतात. त्याचप्रमाणे सतत शिंका, नाक चोंदणे, घसा बसणे, थकवा, डोळे चुरचुरणे किंवा पाणी येणे ही याची लक्षणे आहेत.

त्यावर उपचार कसे करावे?

तुमच्या अॅलर्जीच्या खोकल्याचे कारण समजून घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल आणि त्यानंतर ते योग्य उपचार सुचवतील. हे उपचार प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे असू शकतात. तुम्हाला डॉक्टर औषधाच्या गोळ्या देतील. त्याचप्रमाणे तुम्ही स्वत:हून औषधाच्या दुकानांतून औषधे घेऊ नका, असे केल्याने तुमची परिस्थिती अधिक गंभीर होईल.

अॅलर्जीचा खोकला दूर ठेवण्याच्या काही टिप्स

  • तुम्हाला ज्या घटकांची अॅलर्जी आहे ते घटक तुम्ही टाळाल किंवा आपल्या शरीरापासून लांब ठेवाल. पोलन, बुरशी, प्राण्यांची विष्ठा, धुळीतील किड्यांपासून लांब राहावे.
  • डॉक्टरांनी सुचविलेली अँटि-हिस्टामाईन औषधे तुम्हाला हिस्टामाइन स्त्रवण्याला प्रतिबंध करेल आणि भरलेले नाक, वाहणारे नाक आणि नाकपुड्यांमधील सूज यासारख्या लक्षणांपासून दिलासा मिळू शकतो.
  • तुमच्या डॉक्टरने सुचविलेले डिकन्जेस्टंट्स घेऊ शकता. त्यामुळे चोंदलेल्या आणि वाहणाऱ्या नाकापासून दिलासा मिळेल.
  • घराबाहेर पडताना तुम्ही तुमचा चेहरा झाकावा, जेणेकरून धूळ आणि परागकण टाळता येतील.
  • तुम्ही त्वचेची किंवा रक्ताची चाचणी करूनही ही समस्या हाताळू शकता. त्यामुळे तुम्हाला नक्की कशाची अॅलर्जी आहे ते समजेल. काहींच्या बाबतीत या खोकल्याचे निदान करण्यासाठी फुफ्फुसांचीच चाचणी, छातीचा एक्स-रे किंवा ब्रॉन्कोस्कोपी करण्याची गरज असू शकते.
  • अॅलर्जी होणाऱ्या घटकांपासून सतर्क राहिले पाहिजे. तुमचे डॉक्टर तुम्हाला अँटि-अॅलर्जी औषधे सुचवू शकतात.
  • बाहेर पडण्यापूर्वी मास्क घालू शकता किंवा धुळ असलेली किंवा अस्वच्छ ठिकाणी जाणे टाळावे.
  • तुम्ही तुमचा परिसर स्वच्छ ठेवा आणि धूळ टाळा.
  • डॉक्टरकडे पाठपुरावा करणे आणि नियमित तपासणी करून घेणे हितकारक ठरेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -