घरलाईफस्टाईलकेमिकलयुक्त रंगांऐवजी घरीच तयार करा 'नैसर्गिक रंग'!

केमिकलयुक्त रंगांऐवजी घरीच तयार करा ‘नैसर्गिक रंग’!

Subscribe

बाजारातील केमिकलयुक्त रंगांचा वापर केल्यामुळे त्वेचेचे आणि केसांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे यंदाच्या होळीला घरच्या घरीच नैसर्गिक रंग वापरुन होळी साजरी करा.

होळीचा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तसेच होळी म्हटलं की रंग हे आलेच. या रंगात रंगण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. त्यामुळे अनेक जण आनंदाने मनसोक्त रंगाचा आनंद घेत होळी खेळतात. मात्र हे रंग बऱ्याचदा तुमच्या त्वचेचं नुकसान करू शकतात. यासाठी घरच्या घरी तयार करा नैसर्गिक रंग.

गुलाबी रंग

गुलाबी हा रंग जास्तीत जास्त मुलींना आवडतो. हा रंग तयार करण्यासाठी तुम्ही बीटाचा वापर करु शकता. यासाठी बीटाची मुळं किंवा बीट पाण्यामध्ये उकळून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये दूध मिक्स करुन गुलाबी रंग तयार करा.

- Advertisement -

पिवळा रंग

बेसन आणि हळद दोन्ही एकत्र करुन घ्या. हे एकत्र केल्यानंतर तुम्हाला पिवळा रंग मिळण्यास मदत होईल. हे दोन्ही पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

ब्राउन रंग

ब्राउन रंग तयार करण्यासाठी कॉफी किंवा चहा पावडरचा वापर करावा. कॉफी किंवा चहा पाण्यामध्ये उकळून तुम्ही ब्राउन रंग तयार करु शकता. तसेच हा रंग तयार करताना त्यामध्ये थोडीशी मुलतानी माती मिक्स करु शकता.

- Advertisement -

हिरवा रंग

हिरवा रंग तयार करण्यासाठी पालक, धने, पुदीना, टॉमेटो किंवा कडुलिंबाची पाने वाटून पाण्यामध्ये एकत्र करुन हिरवा रंग तयार करा.

निळा रंग

निळा रंग तयार करण्यासाठी निळीचा वापर करता येऊ शकतो.

लाल रंग

लाल रंग तयार करण्यासाठी पाण्यामध्ये गाजर उकळून घ्या. यामुळे लाल रंग तयार होतो. तसेच जास्वंदाच्या फूलाच्या पावडरचा देखील लाल रंग म्हणून वापर करु शकता.


वाचा – या टिप्स वापरून त्वचा आणि केसांना ठेवा होळीच्या त्रासापासून दूर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -