तुम्हाला माहित आहे का? वयानुसार किती झोप घेणे आवश्यक असते

How much sleep is required by age
वयानुसार किती झोप घेणे आवश्यक असते

बऱ्याचदा लहान मुल रात्रीची झोपत नाही. त्यावेळी मोठी माणसे म्हणतात की, बाळाची झोप कमी आहे. बाळ झोपतच नाही आणि यामुळेच बाळाची चिडचिड होते. पण, बाळाबाबतच नाही तर सर्वांची झोपण्याची एक वेळ असते. विशेष म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा वयानुसार झोप घेतो. चला तर जाणून घेऊया वयानुसार किती वेळ झोप घेणे आवश्यक असते.

नवजात ते ३ महिने

नवजात बाळ ते ३ महिन्याचे बाळ यांना दिवसातून १४ ते १७ तास झोप घेणे आवश्यक आहे.

४ ते ११ महिन्यांचे बाळ

चार महिन्यांचे बाळ ते अकरा महिन्यांच्या बाळाला १२ ते १५ तास झोप घेणे आवश्यक आहे.

१ वर्ष ते २ वर्ष

एक वर्ष ते दोन वर्ष ११ ते १४ तास झोप घेणे आवश्यक आहे.

३ ते ५ वर्ष

३ ते ५ वर्षाच्या मुलांना १० ते १३ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.

६ वर्ष ते १३ वर्ष

सहा ते १३ वर्षांच्या मुलांना ९ ते ११ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.

चौदा ते सतरा वर्षे

चौदा वर्ष ते सतरा वर्षाच्या मुलांना ९ ते ११ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.

अठरा ते ६४ वर्षे

१८ वर्ष ते ६४ वर्षाच्या व्यक्तींना ८ ते ९ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.

६५ ते पुढील

६५ ते पुढील व्यक्तींना ७ ते ८ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.