अशी घ्या नवजात बालकाची काळजी

बाळांची काळची घेतली असता त्या बाळांचे वजन लवकर वाढते, स्तनपान लवकर सुरू होते, त्यांना डिसचार्ज लवकर मिळतो आणि सामाजिक व मानसिक विकासही लवकर होतो.

Mumbai
Russia explosion: baby pulled alive from tower block rubble
प्रातिनिधिक फोटो

मुदतपूर्व प्रसूत झालेल्या बाळांच्या बाबतीत तंत्रज्ञानामुळे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. पण या प्रक्रियेत मानवी स्पर्श काहीसा कमी होत गेला आहे. संशोधनातून दिसून आले आहे की, मानवी स्पर्श महत्त्वाचा आहे आणि त्याला आता ह्युमन निओनॅटल केअर (मानवी स्पर्शाचा उपयोग करून केलेली नवजात आरोग्यसेवा) म्हटले जाते. ह्युमन निओनॅटल केअर म्हणजेच नवजात बालकांची माणसांनी मायेने काळजी घेणे आणि त्यांना यंत्रांच्या हाती न सोपविणे. ज्या बाळांची अशा प्रकारे काळजी घेतली जाते, त्या बाळांचे वजन लवकर वाढते, स्तनपान लवकर सुरू होते, त्यांना डिसचार्ज लवकर मिळतो आणि सामाजिक व मानसिक विकासही लवकर होतो.

एनआयसीयूमध्ये आईची भूमिका

एनआयसीयूमध्ये आईने लवकरात लवकर सहभागी होणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. तिला आजारी बाळाची शुश्रुषा करणाऱ्या आरोग्य सेविकेप्रमाणे वागवले जाते. पूर्वी मातांना एनआयसीयूमध्ये प्रवेश नव्हता आणि त्यांना त्यांची बाळे काचेच्या दरवाज्यातून किंवा अरुंद खिडक्यांमधून दाखवली जात असत. ही पद्धत आता बदलली आहे आणि मातेचा सहभाग हा आता ह्युमन निओनॅटल आरोग्यसेवेचा पाया झाला आहे. सुदृढ आरोग्य असो वा आजार असो, मानवाचे अस्तित्व स्पर्श, गंध, दृष्टी, श्रवण आणि चव या पंचेंद्रियांवर आधारित असते. मुदतपूर्व प्रसूत झालेले नवजात बालक हेही त्याला अपवाद नाही. या बालकांभोवती व्हेंटिलेटर ट्युबिंग, फीडिंग ट्युब्स, आयव्ही कॅन्युला, मॉनिटर प्रोब्स, फोटो थेरपी गॉगल्स असतात. त्यांनाही लवकर बरे होण्यासाठी या मूलभूत इंद्रियांची अत्यंत आवश्यकता असते.

डॉक्टरांनी सांगितलेले उपाय

· बाळाला त्यांच्या गंभीर अवस्थेत मातेने कुरवाळले असता ऑक्सिजनेशन वाढते आणि त्याची प्रकृती सुधारण्यासाठी मदत होते.

· मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळांच्या माता त्यांना स्तनपान देऊ शकत नाहीत. ही बालके आपल्या गंभीर आजारातून बरी होत असतात. त्यांना व्हेंटिलेटर लावलेला असतो किंवा कृत्रिम पद्धतीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत असतो. त्यामुळे बाळाला तोंडावाटे अन्न देण्यापूर्वी बाळाजवळ स्तनांमधून येणाऱ्या दुधाने भरलेली वाटी ठेवली तर त्याची गंध ओळखण्याची आणि चव समजण्याची यंत्रणा उद्दिपित होते. त्यामुळे अशा बाळांमध्ये स्तनपानाचा पाया रचण्यास मदत होते.

· बाळाला सौम्य संगीत ऐकवले किंवा पालकांच्या आवाजाचे ध्वनिमुद्रण ऐकवले तर बाळांना मल्टिपॅरा मॉनिटर्स आणि व्हेंटिलेटरच्या आवाजामुळे येणाऱ्या ताणावर मात करता येते.

· ओरोमोटर स्टिम्युलेशन – अन्नसेवनाच्या बाबतीत उदासीनता दाखविणाऱ्या बाळांना ओरोमोटर स्टिम्युलेशन देण्यात येते. एक बोट वापरून, बाळाच्या चेहऱ्याचे स्नायू, गाल, ओठ आणि जीभेला उद्दिपित करण्यात येते. ही क्रिया माता किंवा नर्स करू शकते.

· नॉन-न्युट्रिटिव्ह सकिंग – बाळाला रिकामे स्तन किंवा मातेची करंगळी चोखण्यास दिली जाते, जेणेकरून त्याची ओरोमोटर (तोंड, जबडा, जीभ, ओठ या तोंडातील अवयवसांच्य स्नायूंची हालचाल) क्रिया सुरू राहील.

खारघर मदरहूड हॉस्पीटलचे सल्लागार डॉ अभिजीत म्हापणकर