घरलाईफस्टाईलहेल्दी स्कीनसाठी नियमित करा क्निंजिंग

हेल्दी स्कीनसाठी नियमित करा क्निंजिंग

Subscribe

आतापर्यंत तुम्ही अशाच प्रकारे चेहरा धुत आला आहात ना.. असो, परंतु तुम्ही ज्या प्रकारे चेहरा धुता ही पध्दत एकदम चुकीची आहे.

आपला चेहरा ओला करा.त्यानंतर थोडा फेस वॉश लावा, चेहरा पाण्याने धुवून घ्या.
आतापर्यंत तुम्ही अशाच प्रकारे चेहरा धुत आला आहात ना.. असो, परंतु तुम्ही ज्या प्रकारे चेहरा धुता ही पध्दत एकदम चुकीची आहे. चेहर्‍याची क्लिंन्जिंग करणे ही स्वस्थ आणि तजेलदार त्वचेसाठीचे पहिले पाऊल आहे. जर तुम्ही पहिली स्टेपच चुकीची करत असाल तर नंतर चमकता चेहरा कसा मिळवू शकता? चला तर आज आपण पाहुया कशाप्रकारे चेहरा धुतल्याने स्किन हेल्दी राहते ते.

स्टेप १- आपले हात स्वच्छ धुवा
आश्चर्य वाटले ना? अनेक लोक या महत्त्वाच्या स्टेपवर दुर्लक्ष करतात. ते त्यांचा चेहरा हात न धुताच धुवून घेतात. यामुळे फक्त जर्म्स ट्रान्सफर होतात. जास्त फेस वॉशेस् हे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी-जर्मीसाइड नसतात. यामुळे असा विचार करू नका, की तुमचा हातसुद्धा तुमच्या चेहर्‍यासोबत धुतला जाईल.

- Advertisement -

स्टेप २ – मेकअप काढा
तुम्ही मेकअप रिमूव्हरचा वापर करा किंवा क्लिन्जिंग लोशनचा. या स्टेपचा मुख्य उद्देश आहे स्वच्छ स्किन मिळवणे. यामुळे तुमच्या फेस वॉशला चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळते. मेकअपला धुण्यासाठी एका स्पेशल फॉर्मुल्याची गरज असते आणि फेस वॉश एवढे स्ट्राँग नसतात. जर तुम्ही मेकअपचा वापर करत नसाल तर पुढील स्टेप वाचा.

स्टेप ३- कोमट किंवा साध्या पाण्याचा वापर
जास्त गरम किंवा थंड पाणी तुमच्या चेहर्‍याला नुकसान पोहचवते. तुमच्या ब्लड वेसेल्सलासुध्दा नुकसान पोहचू शकते. चांगल्या रिझल्टसाठी कोमट पाण्याचा वापर करा. रुम टेम्परेचर असणारे पाणी स्किनसाठी बेस्ट राहील.

- Advertisement -

स्टेप ४- दोन मिनिटे वेळ द्या
आपला चेहरा धुताना आपण जी सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे घाई. आपण आपला चेहरा धुण्यासाठी एक मिनिटचा वेळसुध्दा देत नाही. लक्षात ठेवा की हलक्या हातांनी लहान सर्क्युलर मोशन्सनी आपला चेहरा स्वच्छ करा.

स्टेप ५- हळुच पुसून काढा
चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने चेहरा हलक्याने पुसून काढा. जास्त जोर लावून चेहरा पुसण्याची चूक कदापी करू नका. असे केल्याने त्वचा जास्त खराब होण्याची शक्यता असते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -