घरलाईफस्टाईलअशी स्वच्छ करा स्वयंपाक घरातील भांडी

अशी स्वच्छ करा स्वयंपाक घरातील भांडी

Subscribe

स्वयंपाक घरातील भांडी कशी करावी स्वच्छ

बऱ्याचदा आपल्या स्वयंपाक घरात अल्युमिनियम, लोखंड, स्टिल अशी वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतात. मात्र, ही भांडी कशाप्रकारे स्वच्छ करायची याबाबत माहिती नसते. त्यामुळे आज आम्ही स्वयंपाक घरातील भांडी कशी साफ करायची ते सांगणार आहोत.

  • अल्युमिनियमच्या जळालेल्या तव्याला साफ करण्यासाठी त्यात एक कांदा टाकून उकळून घ्या आणि नंतर भांडे धुवायच्या पावडरने धुवा तवा साफ होईल.
  • लोखंडी तवा साफ करण्यासाठी ब्लिचिंग पावडरला गरम पाण्यात टाका आणि त्याने तवा साफ करा. यामुळे तव्याची चमक कायम राहिल.
  • जर अल्युमिनियम फॉईलला चेंडूसारखे लपेटून भांडे धुवायच्या पावडरसोबत मिसळून तवा साफ केला तर भांड्यावर लागलेले डाग निघून जातील.
  • तव्यावरचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा, मीठ, व्हिनेगरचे मिश्रण करुन तवा घासा.
  • मेटलचे भांडे स्वच्छ करण्यासाठी पाणी आणि व्हिनेगर मिसळा आणि त्यात भांडे थोडा वेळ भिजवा नंतर धुवा यामुळे मेटलचे नव्यासारखे दिसतील.
  • साबणाने तवा धुतल्याने वरता भाग खराब होतो म्हणून त्यावर मीठ टाका आणि नॅपकीनने साफ करुन सुकू द्या.
  • अनेकदा नवीन भांडे आणले का? त्याला लेबल असते. ते काढण्यासाठी लेबलच्या आतील बाजूस भांडे गरम करा. यामुळे त्या लेबलचा गम निघण्यास मदत होईल. मग ते अलगत सुरीने काढून घ्या. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरातील भांडी स्वच्छ करु शकता तेही झटपटरित्या.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -