घरलाईफस्टाईलमासिक पाळीदरम्यान 'आहार'

मासिक पाळीदरम्यान ‘आहार’

Subscribe

जाणून घ्या मासिक पाळीदरम्यान कसा घ्यावा आहार

सध्याच्या धावपळीच्या जिवनात अनेक महिलांना अनियमित मासिक पाळीची समस्या उद्धभवते. मासिक पाळी उशीरा येणे. दोन – दोन महिन्यांनी येणे किंवा एका महिन्यात दोनदा येणे. अशा अनेक तक्रारी महिलांकडून सतावतात. मात्र, या दरम्यान आहारावर लक्ष दिल्यास मासिक पाळीची समस्येबाबत तक्रारी दूर होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया मासिक पाळीदरम्यान आहार कसा घ्यावा.

आलं

- Advertisement -

मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव कमी होत असल्यास आहारात आलं अत्यंत परिणामकारक ठरते. यामुळे रक्तस्राव नियंत्रित होतो. तसेच आल्याचे सेवन केल्याने पोटदुखी कमी होते. अशावेळी दिवसातून २ – ३ वेळा आल्याचा चहा घ्यावा.

- Advertisement -

पपई

कच्ची किंवा पिकलेली पपई खाल्यास रक्तस्राव साफ होण्यास मदत होते. तसेच पाळी दरम्यान ओटीपोटात दुखण्याचा त्रास देखील कमी होतो. पाळी येण्याच्या ३ दिवस आधी कच्ची पपई खावी किंवा पपईच्या पानांचे चूर्ण रोज २ वेळा अर्धा चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावे. यामुळे फायदा होतो.

तीळ

पाळी नियमित करण्यासाठी तीळ फार उपयुक्त ठरतात. दिवसातून २ वेळा अर्धा चमचा तिळकूट गरम पाण्यातून घ्यावे किंवा तिळाचे लाडू देखील खाल्यास ते उपयुक्त ठरतात. तसेच तीळ खाल्यास रक्तस्राव साफ होण्यास मदत होते. त्यासोबतच तिळाचे सेवन पाळीच्या ३ दिवस आधी करावे. यामुळे त्याचा अधिक फायदा होतो.

हिंग

 

आहारात हिंगाचे प्रमाण वाढवावे. दररोज २ वेळा अर्धा चमचा गरम पाण्यात हिंग मिसळून घेतसल्याने पाळी नियमित येते.

(टीप – मासिक पाळीदरम्यान त्रास कमी होत नसल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे)


हेही वाचा – दररोज एक अक्रोड खा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -