घरलाईफस्टाईलमेहंदी तो रंग लाएगी

मेहंदी तो रंग लाएगी

Subscribe

मेहंदी रंगण्यासाठी वाचा या खास टीप्स...

मेहंदी खास करुन लग्न समारंभ आणि सणांच्यानिमित्त काढली जाते. परंतु मेहंदी कोन कुठून घ्यायचा? आपण काढलेली मेहंदी रंगेल ना असे एक ना अनेक प्रश्न सतावत असतात. अनेक वेळा मेहंदी रंगण्यासाठी उपाय केले जातात. मात्र त्याला यश येत नाही. परंतु मैत्रिणींनो काळजी करण्याची गरज नाही. मेहंदी कोन कुठून ही विकत घ्या. या खास घरगुती टीप्सचा वापर केल्यास तुमची मेहंदी नक्कीच रंगेल. चला तर जाणून घेऊया मेहंदीचा रंग चढण्यासाठी खास घरगुती टीप्स

साखर पाणी

प्रथम मेहंदी काढून झाल्यानंतर ती थोडी सुकल्यावर झोपण्यापूर्वी पाण्यात थोडीशी साखर मिक्स करुन ते पाणी कापसाने मेहंदीवर लावावे. यामुळे सुकलेली मेहंदी न पडता साखरेच्या पाण्याला घट्ट पकडून ठेवते. त्यामुळे जास्त वेळ मेहंदी हातावर राहिल्याने मेहंदीचा रंग चढतो.

- Advertisement -

खोबरेल तेल

मेहंदी सकाळी पाण्याने न धुता चमच्याने काढून घ्यावी. त्यानंतर खोबरेल तेलाचे दोन थेंब हातावर घेऊन हात एकमेकांवर चोळावे. यामुळे मेहंदीला चांगला रंग येतो.

लवंग

मेहंदी रंगण्यासाठी लवंग एक रामबाण उपाय आहे. मेहंदी चमच्याने काढून घेऊन हात पाण्यात न बुडवता हाताला लवंगाचा शेक द्यावा. त्यामुळे मेहंदीचा रंग चढतो.

- Advertisement -

विक्स वेपोरब

मेहंदी रंगण्यासाठी विक्सचा वेपोरबचा वापर करावा. मेहंदीचा रंग वाढवण्यासाठी मेहंदी काढून दोन्ही हातावर विक्स वेपोरब किंवा आयोडेक्स लावून हात एकमेकांवर घासावे. यामुळे मेहंदीचा रंग खुलण्यास मदत होते.

मोहरीचे तेल

मेहंदी काढून झाल्यानंतर त्यावर कापसाने मोहरीचे तेल लावावे. यामुळे मेहंदीचा रंग खुलून दिसेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -