या टिप्स वापरून त्वचा आणि केसांना ठेवा होळीच्या त्रासापासून दूर!

होळीत रंग, धुळ आणि उष्णतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्वेचेचे आणि केसांने नुकसान होते. मात्र अशा खास टीप्स वापरल्यास तुमच्या त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होईल.

Mumbai
holi festival
होळी

होळी म्हटलं की रंग हे आलेच. या रंगात रंगण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. त्यामुळे अनेक जण आनंदाने मनसोक्त रंगाचा आनंद घेत होळी खेळतात. मात्र हे रंग बऱ्याचदा तुमच्या त्वचेचं नुकसान करू शकतात. तुम्ही अगदी ऑरगॅनिक रंग वापरत असलात तरी सूर्यप्रकाशात आणि रंगांच्या पाण्यात तुमचा बराच वेळ जाणार आहे. पण, काळजी करू नका. अशा काही टिप्स आहेत, ज्यामुळे होळीची धमाल केल्यानंतरही तुमच्या त्वचेचा तजेला कायम राहील!

नारळाचे तेल

रंगांना अटकाव करण्यासाठी नारळाचे तेल वापरा. या तेलामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते आणि रंग त्वचेत कमी प्रमाणात झिपरतात. शिवाय, त्वचा आणि केसांवर संरक्षक कवच असल्यास रंग धुवून काढणेही सोपे होते. त्वचेला अधिक मॉइश्चराइज करण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून लावू शकता.

लिप बाम

नुकसान पोहोचवणाऱ्या सर्व घटकांचा ओठांशी संपर्क येतो. त्यामुळे, ओठांच्या भेगांमध्ये रंग अगदी सहज जातात. चांगल्या दर्जाच्या लिप बामचे ४ ते ५ कोट्स लावून ओठांना नीट घासून घ्या, यामुळे ओठाचा रंग जाण्यास मदत होते.

हँड क्रीम

होळीमध्ये सर्वाधिक दुर्लक्ष होतं ते हातांची काळजी घेण्याकडे. नखांमध्ये रंग चटकन अडकून बसतात आणि ते काढणं अगदी अशक्य होऊन जातं! नखांमध्ये रंग अडकू नयेत आणि क्युटिकल्सचे नुकसान होऊ नये. यासाठी भरपूर हँड क्रीम लावा. नखं लहानच ठेवा. शिवाय, होळीच्या आधी अॅक्रॅलिक किंवा जेल नेल्सचा वापर टाळा.

शॅम्पू

होळीच्या रंगापासून केसांना पूर्णपणे वाचवणे अशक्य आहे. पण, हा त्रास कमी करता येईल. त्यासाठी सौम्य कडिंशनिंग असणारा माइल्ड स्वरुपातील शॅम्पू वापरून केसांमधील मॉइश्चर संरक्षित ठेवा. एकाच वेळी सारखेसारखे केस धुवू नका. त्याऐवजी, केस धुण्यामध्ये काही काळाचे अंतर ठेवा. त्यामुळे, त्वचेतून निर्माण होणारे नैसर्गिक तेल धुवून जाणार नाही आणि केस कोरडे होणार नाहीत.

स्क्रब

मृत त्वचा काढून टाकणे आणि बंद झालेली छिद्रे मोकळी करण्यासाठी होळीनंतर दुसऱ्या दिवशी फेस स्क्रब वापरा. चेहऱ्यावर हळुवारपणे गोलाकार लावा. शरीराच्या इतर भागांवरही स्क्रबचा वापर करता येईल. कोमट पाण्याने धुवून घ्या आणि त्यांनतर त्वचा कोरडी पडू नये यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करा.

फेस मास्क

होळी झाली की करण्याच्या कामात याचा समावेश होतो. होळीमध्ये अनेक प्रकारची रसायने आणि इतर घटकांचा तुमच्या त्वचेशी संपर्क होतो. त्यामुळे, त्वचेला आराम देण्यासाठी तुम्ही हर्बल फेस पॅक वापरू शकता. त्वचेवर हळुवार मालिश करा आणि मास्क १० ते १५ मिनिटं राहू द्या. मास्कमुळे तुमच्या त्वचेला आराम मिळेल, कमी झालेले माइश्चरायझर पुन्हा निर्माण होईल आणि त्वचेची स्वच्छता होईल. एक-दोन वेळ मास्क लावल्यास त्वचा पुन्हा पुर्ववत होत असल्याचे तुम्हाला जाणवेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here