झटपट करा पेरूची चटणी

how to made guava chutney
झटपट करा पेरूची चटणी

हिवाळा सुरू झाला की पेरू हे फळं बाजारात मोठ्या प्रमाणात येते. पेरू खाण्याचे अनेक फायदे असतात. त्यामुळे आज आपण पेरूची चटणी तयार कशी करतात हे पाहणार आहोत.

साहित्य –

  • पिकलेले पेरू – २
  • कोथिंबीर
  • पुदीना
  • हिरवी मिरची
  • आले
  • जिरे
  • चाट मसाला
  • मीठ
  • जीरे पावडर
  • लिंबू

कृती –

सर्वप्रथम पिकलेल्या पेरूचे चार भागात कापून घ्यायचे. मग त्यामध्यल्या बिया काढून पेरू छोट्या किसणीवर किसून घ्यायचा. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर, पुदीना, तीन-चार हिरव्या मिरच्या, थोडेसे आले, जिरे, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून जाडसर वाटून घ्यायचे. मग त्यामध्ये दोन चमचे पाणी आणि एक चमचा किसलेला पेरू घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर हे मिश्रण किसलेल्या पेरूत घालायचे आणि त्यामध्ये जीरे पावडर घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे. मग त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही पेरूची चटणी तयार करू शकता.