घरलाईफस्टाईलहिवाळ्यातील स्पेशल रेसिपी; पौष्टीक अळीव लाडू

हिवाळ्यातील स्पेशल रेसिपी; पौष्टीक अळीव लाडू

Subscribe

असे तयार करतात अळीव लाडू

हिवाळ्याच्या दिवसात खाण्यासाठी खूप साऱ्या पौष्टीक रेसिपी आहेत. त्यातील अळीवाचे लाडू हे खूप प्रसिद्ध आहेत. अळीवाचे लाडू फक्त गर्भवती खावेत असं काही नाही. त्यामुळे आज आपण अळीव लाडू कसे तयार करतात? हे जाणून घेणार आहोत.

साहित्य

अर्धा कप अळीव, एक कप नारळाचे पाणी, तीन कप ओला खवलेल्या नारळाचा किस्स, १ कप गूळ, १ चमचा बदामाचे काप, १ चमचा काजूचे काप, जायफळ

कृती

  • अर्धा कप अळीव घेऊन ते चांगले निवडून घ्यावेत. निवडून झाल्यानंतर त्यामध्ये एक कप नारळाचे पाणी किंवा साध पाणी घालावं.
  • त्यानंतर निट मिश्रण मिसळून घ्यावं आणि दोन तास त्या मिश्रणावर झाकणं घालून ठेवावं.
  • मग दोन तास झाल्यानंतर तीन कप ओला खवलेल्या नारळाचा किस्स कडईत घालावा.
  • त्यानंतर अळीव घालून त्यामध्ये १ कप गूळ घालावा. मग १ चमचा बदामाचे काप आणि १ चमचा काजूचे काप घालावे.
  • हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. जोपर्यंत हे मिश्रण घट्ट नाही होत तोपर्यंत हे मिश्रण हालवतं राहवं.
  • मिश्रण घट्ट झाल्यानंतर जायफळ किसून घालावं. हे मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर लाडू बांधून घ्यावेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -