झटपट ‘ट्राय बटाटा मंचुरियन’ रेसिपी

Mumbai
how to make aloo manchurian
झटपट 'ट्राय बटाटा मंचुरियन' रेसिपी

आपण या अगोदर कोबी मंचुरियन कसे करतात हे पाहिलं आहे. त्यामुळे आज आपण ट्राय बटाटा मंचुरियन कसे बनवतात ते पाहणार आहोत.

कृती 

बटाटे, १३० ग्रॅम मैदा, कॉर्न फ्लोर किंवा तांदळाचे पीठ, कांदा, लसूण, लाल मिरची पावडर, मीठ, खाण्याचा लाल रंग, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, टॉमटो सॉस, व्हाइट विनेगर आणि सोया सॉस

साहित्य

सर्वप्रथम बटाट्याची साल काढल्यानंतर बारिक कापून घ्या. त्यानंतर बारिक कापलेले बटाट्यांमध्ये पाणी आणि मीठ घालून शिजवून घ्या. खूप जास्त बटाटे शिजवू नका. मग शिजवून झालेले बटाटे थंड होईपर्यंत मंचुरियनसाठी लागणार पीठ तयार करा. १३० ग्रॅम मैदा बाऊल मध्ये घ्या. दोन कप कॉर्न फ्लोर किंवा तांदळाचं त्यात टाका. त्यानंतर १ टेबल स्पून कांदा आणि लसण्याची पेस्ट, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ घालावे आणि थोड्याप्रमाणात खाण्याचा लाल रंग देखील घालावा. मग या सर्व मिश्रणात थोड थोड पाणी घालून मिक्स करा. मग उकडलेले बटाटे या मिश्रणात घालून पुन्हा मिक्स करून घ्या. त्यानंतर बटाटे मंचुरियन तळून घ्या. अजून क्रिस्पी करण्यासाठी पुन्हा एकदा तळून घ्या.

मग एका पॅनमध्ये गरम तेल करा. त्यात बारिक केलेली लसूण आणि कांदा घाला. लसूण आणि कांदा भाजल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेऊन त्यात रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, २ चमचे टॉमटो सॉस, १ टिस्पून व्हाइट विनेगर, २ चमचे सोया सॉस आणि अर्धा चमचा मीठ घालून ते मिश्रण परतवून घ्यावं. त्यानंतर तळलेले बटाटे मंचुरियन या मिश्रणात मिक्स करून झाल्यानंतर तयार झाले ट्राय बटाटे मंचुरियन.


हेही वाचा – असे बनवा घरच्या घरीच मंचुरियन