घरलाईफस्टाईलबेसनाचे चमचमीत 'धिरडे'

बेसनाचे चमचमीत ‘धिरडे’

Subscribe

बऱ्याचदा नाश्ता काय करावा, असा सर्वच गृहिणींना प्रश्न पडतो. त्यात तो नाश्ता पौष्टिक असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खमंग आणि चविष्ट नाश्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहोत.

साहित्य

  • अर्धा कप बेसन पीठ
  • १/४ कप तांदळाचे पीठ
  • १ चमचा बारीच चिरलेला कांदा
  • १ चमचा बारीच चिरलेला टोमॅटो
  • २ चमचे कोथिंबीर
  • १ हिरवी मिरची
  • अर्धा चमचा लाल मिरची पावडर
  • चिमूटभर हळद
  • चिमूटभर ओवा
  • चवीनुसार मीठ

कृती

सर्वप्रथम बेसन, तांदळाचे पीठ, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, चिमूटभर हळद, चिमूटभर ओवा आणि चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण एकजीव करुन घ्यावे. त्यात थोडे पाणी घालून जाडसर असे बॅटर करुन घ्यावे. नंतर एका पॅनवर थोडेसे तेल घालून हे सारण पसरवून घ्यावे, अशाप्रकारे चमचमीत बेसनाचे धिरडे तयार. हे धिरडे तुम्ही सॉस किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -