घरलाईफस्टाईल'या' उटण्याने खुलवा तुमचे सौंदर्य

‘या’ उटण्याने खुलवा तुमचे सौंदर्य

Subscribe

जाणून घेऊया घरगुती उटणे कसे तयार करावे.

बऱ्याचदा आपण उटणे हे दिवाळीतच लावतो. मात्र, आठवड्यातून एकदा किंवा दोन दिवसातून एकदा घरगुती उटणे आपण आपल्या चेहऱ्याला लावल्यास आपला चेहरा अधिक स्वच्छ, चमकदार आणि टवटवीत राहतो. चला तर जाणून घेऊया हे घरगुती उटणे कसे तयार करावे.

साहित्य

- Advertisement -
  • बेसन – २ चमचे
  • चंदन पावडर
  • हळद पावडर – अर्धा चमचा
  • कापूर – चिमुटभर
  • पाणी / गुलाबजल / दूध (यापैकी एक वापरा)

कृती

सर्वप्रथम बेसन, चंदन पावडर, हळद पावडर आणि कापूर यांचे पाणी अथवा गुलाबजल अथवा दूध वापरून थोडे घट्ट मिश्रण बनवा. ते एकसारखे तुमच्या चेहऱ्यावर लावा. २० मिनिटे तसेच ठेवा. नंतर पाण्याने धुवून काढा. त्यानंतर कापसाच्या दोन पट्ट्या गुलाबपाण्यात भिजवून त्या डोळ्यांवर ठेवा आणि मग बघा तुमचा चेहरा तजेलदार होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -