घरताज्या घडामोडीकांद्याच्या पातीची कोशिंबीर

कांद्याच्या पातीची कोशिंबीर

Subscribe

कांद्याची पात अशी भाजी आहे ती कोणत्याही पदार्थात वापरता येते. कांद्याच्या पातीमुळे पदार्थाला छान चव येते. त्यामुळे आज आपण कांद्याच्या पातीची कोशिंबीर कशी तयार करायची हे जाणून घेणार आहोत.

साहित्य 

- Advertisement -

१ जुडी कांद्याची पात, २ ते ३ चमचे शेंगदाण्याचा कूट, १ चमचा तेल, १ छोटा चमचा गोडा मसाला, १ छोटा चमचा तिखट मसाला, १ छोटा चमचा लिंबाचा रस, २ चिमूटभर साखर आणि चवीनुसार मीठ

कृती 

- Advertisement -

पहिल्यांदा कांद्याची पात स्वच्छ धुवून ती चिरून घ्यावी. मग एका भांड्यात तेला ओतून त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, गोडा मसाला, तिखट, मीठ, लिंबाची रस आणि साखर घालून सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे. मग यामध्ये चिरलेली कांद्याची पात घालावी. अशाप्रकारे कांद्याच्या पातीची कोशिंबीर तयार करू शकता. करायला एकदम सोप्पी आणि फोडणी वगैरेची भानगड नसल्याने पटकन होणारी ही रेसिपी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -