झटपट मसाला पराठा

Mumbai
how to make masala paratha
झटपट तयार करा मसाला पराठा

सध्या सगळेजण घरी असल्यामुळे अनेक रेसिपी ट्राय करत आहेत. लॉकडाऊनमुळे फायदा हाच झाला की आपल्या सगळ्याचे बाहेर खाणं कमी झालं आणि आपण घरीच अनेक पदार्थ तयार करून खाऊ लागलो. म्हणून आज आपण झटपट मसाला पराठा कसा करतात ते पाहणार आहोत.

साहित्य

एक चमचा धनेपूज, जिरे पूड, तेल किंवा बटर, कांदा मसाला किंवा गरम मसाला, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, पाव चमचा पिठीसाखर, दोन-तीन चमचे तीळ आणि पोळ्यांची कणीक

कृती

प्रथम कणकेचा एक गोळा घेऊन पिठीसाखरवर फुलक्या एवढी पोळी लाटावी. मग नेहमीप्रमाणे तेल किंवा बटर लावावे. तीळ सोडून इतर सर्व मसाले एकत्र कालवावे. त्यानंतर हा सर्व मसाला एक चमचा लाटलेल्या फुलक्यावर पसरावा आणि त्यांची गुंडाळी करून चकलीप्रमाणे घट्ट वळवावा, दाबावा. मग पिठी आणि तिळावर जाडसर पुन्हा फुलका लाटावा. त्यानंतर तव्यावर तेल सोडून खरपूस भाजावा. अशा प्रकारे तुम्ही मसाला पराठा तयार करा आणि सॉससोबत खा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here