श्रावण स्पेशल रेसिपी – पुरणाचे कडबू

Mumbai
how to make purnache kanhole or purnache kadabu
श्रावण स्पेशल रेसिपी - पुरणाचे कडबू

चविष्ट आणि गोड पदार्थ आपण श्रावण महिन्यात करत असतो. त्यामुळे श्रावण महिन्यातल्या सणासुदीच्या दिवशी हे पुरणाचे कडबू तुम्ही नक्की ट्राय करु शकता.

साहित्य –

एक कप चण्याची डाळ, १ कप चिरलेला गूळ, जायफळ पावडर, वेलेची पावडर, मीठ, १ कप गव्हाच पीठ, दोन चमचे रवा, तेल आणि मीठ

कृती –

  • सर्वप्रथम चण्याची डाळ ही तीन ते चार वेळा धुवू घ्या. त्यानंतर दोन किंवा पावने दोन कप डाळीत पाणी घाला. मग त्यामध्ये थोड्याप्रमाणात हळद घालून ती शिजवून घ्या.
  • डाळ शिजेपर्यंत कान्होल्याच्या बाहेरचे आवारणासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाच्या पीठात तेल, रवा आणि मीठ घाला. आपण जसं पूरीच पीठ भिजवतो तसंच हे देखील करायचं आहे. गव्हाचे मीठ मळून झाल्यानंतर ते १० ते १५ मिनिटं तसंच ठेवा.
  • शिजून झालेल्या डाळीचं पाणी एका भांड्यात काढून घ्या.
  • पुरण शिजवण्यासाठी पहिल्यांदा गॅसवर कढई ठेवा. त्यानंतर कढईत शिजलेली डाळ आणि गूळ घाला. त्यानंतर ते मिश्रण हालवत राहा. ६ ते ७ मिनिटांत हे डाळीच मिश्रण शिजवा.
  • आता हे मिश्रण बारीक करा. बारीक करुन झाल्यानंतर वेलची पावडर, जायफळ पावडर आणि चवीनुसार मीठ घाला.
  • हे सर्व झाल्यानंतर मळलेल्या गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे करुन घ्या. गोळे तयार झाल्यानंतर एक गोळा घेऊन तो पूरी सारखा लाटायचा. लाटून झाल्यानंतर डाळीचे बारीक मिश्रण त्यामध्ये घाला आणि तुम्हाच्याकडे असेलेल्या कान्होल्याच्या आकारत ते कापून घ्याचे.
  • हे झाल्यानंतर कढईत गरम तेल करायचं. त्यामध्ये तयार झालेले कान्होले तळून घ्यायचे. हे झाले पुरणाचे कान्होले किंवा पुरणाचे कडबू.