झणझणीत टोमॅटो ठेचा

how to make Spicy Tomato Chutney
झणझणीत टोमॅटो ठेचा

ठेचा हा प्रकार म्हटले तरी तोंडाला पाणी येते. आपण लाल मिरचीचा, हिरव्या मिरचीचा ठेचा तयार केला आहे. म्हणून तुम्हाला आज आम्ही झणझणीत टोमॅटोचा ठेचा कसा करतात हे सांगणार आहे. तर मग जाणून घ्या टोमॅटो ठेचा कसा तयार करतात

साहित्य –

जिरे, तेल, लसूण, टोमॅटो, बेडगी मिरची, मोठे मीठ

कृती –

पहिल्यांदा एका गरम पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. नंतर सात ते आठ पाकल्या लसणीच्या घालायच्या. मग त्यामध्ये थोडे मोठे चिरलेले चार टोमॅटो घालायचे. त्यानंतर गरम पाण्यात भिजवून ठेवलेली बेडगी मिरची त्यामध्ये घालायची. हे मिश्रण सर्व ६ ते ७ मिनिट फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर चवीनुसार मोठे मीठ घालायचे. मग सर्व मिश्रण मिक्सरमध्ये जास्त बारीक न करता तीन-चार वेळा फक्त फिरवायचे. अशा प्रकारे तुम्ही झणझणीत टोमॅटो ठेचा तयार करू शकता.