घरलाईफस्टाईलसुरळीच्या वड्या

सुरळीच्या वड्या

Subscribe

साहीत्य-
डाळीचे पीठ (बेसन)- १ मोठी वाटी
आंबट ताक -१ मोठी वाटी
पाणी -१ मोठी वाटी
तिखट,मीठ,हळद,हिंग फोडणी व कांदा- खोबर्‍याचे सारण
ओले खोबरे-१/२ वाटी
बारीक चिरलेली कोथिंबीर-१ मूठ
बारीक चिरलेला कांदा -१ मोठा
हिरवी मिरची -१ बारीक चिरुन
१ पळी तेलाची फोडणी (थंड करून घालावी)

पाककृती-
*जाड बुडाच्या पातेल्यात डाळीचे पीठ, ताक, पाणी, तिखट, मीठ, हिंग, हळद घालून मिश्रणासारखे करावे. गुठळी राहू देऊ नये. नंतर हे पातेले गॅसवर ठेवून मिश्रण डावेने ढवळत रहावे.
*खाली लागू देऊ नये. मिश्रण दाटसर होत आले की झाकण ठेवून वाफ आणावी. वरील पातेल्यातील १/४ चमचा मिश्रण एका स्टीलच्या थाळीला पसरून लावून पाहावे.
*गार झाल्यावर जर ते उचलले तर चटकन निघाले पाहिजे. ही मिश्रण शिजल्याची खूण आहे. जर असे चटकन निघाले नाही तर पुन्हा एक वाफ आणावी. नंतर मंद गॅसवर मिश्रण ठेवून द्यावे.
*स्टीलची ३-४ ताटे पुसून अगदी कोरडी करावीत. नंतर प्रथम ताटाच्या आतल्या बाजूला मोठा डावभर मिश्रण घालावे व टेबलस्पून ताटाला सारवल्यासारखे करावे. हे काम खूप झटपट व कौशल्याने करावे लागते.
*मिश्रण ताटभर होत आले की हाताला थोडे तेल लावून ताटभर सारवल्यासारखे करावे. नंतर ताट पालथे घालून त्यावर पुन्हा डावभर पीठ घालून सारवावे. असे सर्व करून घ्यावे.
*सारणासाठी कांदा चिरावा. सर्व वस्तू एकत्र करून त्यावर गार फोडणी घालावी. जेवढी ताटे झाली असतील त्याप्रमाणे सारणाचे भाग पाडून एकेका ताटावर सारण पसरवावे. सुरीने कापून अलगद हाताने वड्या गुंडाळाव्यात.

- Advertisement -

टीप-
नवी/सोपी पाककृती-
सांगितलेले साहित्य एकत्र करावे. नंतर हे पातेले साध्या कुकरमध्ये ४० मिनिटे गॅसवर ठेवावे. नंतर डावेने मिश्रण सारखे करावे व ताटावर पसरुन वड्या पाडाव्यात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -