गव्हाच्या पिठाचा हलावा

Mumbai
गव्हाच्या पिठाचा हलावा
how to make wheat floor halwa

आजकाल आपण झटपट रेसिपी करत असतो. म्हणून आज आपण अशी एक रेसिपी पाहणार आहोत. आज आपण गव्हाच्या पिठाचा हलाव्याची रेसिपी पाहणार आहोत. या गव्हाच्या पिठाचा हलावा तुम्ही लहान मुलांसाठी झटपट तयार करू शकता.

साहित्य

१ कप गव्हाचा आटा, १ कप साखर, पिस्ता, काजू, बदाम, मणका विलची, सुक खोबर, खजूर, चारोळ्या, तूप आणि पाणी

कृती

पहिल्यांदा गरम कडईत दोन चमचे तूप घाला. त्यानंतर गव्हाचा पिठ घाला. मग मंद आचेवर पिठ परतवून घ्यायचे. जोपर्यंत पिठ नीट भाजले जाणार नाही तोपर्यंत पिठ परवत राहायचे. मग त्यामध्ये साखर घालायची. नंतर या मिश्रणात वेलची आणि खोबऱ्याचा किस्स घालायचा. मग त्यानंतर सर्व ड्राय फ्रूट्स घालून सर्व मिश्रण मंद आचेवर परतवायचे. नंतर सर्व मिश्रणात दीड कप पाणी घाला. ज्यावेळेस मिश्रणात पाणी घालाल तेव्हा गॅस फास्ट करा. अशाप्रकारे तुमचा गव्हाच्या पिठाचा हलावा तयार झाला.


हेही वाचा – प्रतिकारशक्ती वाढवताना ‘ही’ काळजी नक्की घ्या!