घरलाईफस्टाईलमहाशिवरात्रीसाठी घरच्या घरी 'अशी' तयार करा भांग!

महाशिवरात्रीसाठी घरच्या घरी ‘अशी’ तयार करा भांग!

Subscribe

महाशिवरात्र ही फार महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भाविक उपवास करतात. भगवान शंकराची पूजा करतात. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करतात. या दिवशी बेलाचे पान, चंदन,धुप, दीप, भांग, धतूरा आणि फुलांनी भगवान शंकराची पूजा केली जाते. आता शंकराला नैवेद्य म्हणून भांग दाखवतात. ही भांग तुम्ही घरी देखील करू शकता.

आवश्यक साहित्य

एक लीटर पाणी
एक कप साखर
२५० ग्रॅम दूध
आधा चमचा बडिशेप
१०-१५ बदाम
छोटा चमचा खसखस
मोठा चमचा खरबूजाच्या बीया
एक छोटा चमचा मीरी
अर्धा चमचा इलायची पावडर
गुलाबाच्या पाकळ्या
१५ भांगेच्या गोळ्या

- Advertisement -

कृती

सगळ्यात आधी पाण्यात साखर टाकून दोन तास ठेवून द्या. एकीकडे दुसऱ्या भांड्यात भांगेच्या गोळ्यांबरोबर बडिशेप,बदाम, खसखस,खरबूजाच्या बीया, मीरी,गुलाबाच्या पाकळ्या थोड्या पाण्यात भिजवून ठेवा. काहीवेळानंतर मिक्समध्ये त्याची पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना भरड राहणार नाही याची काळजी घ्या. नंतर हे मिश्रण मलमल कापडावर घेऊन गाळून घ्या. जर पेस्ट जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात थोडे दूध मिसळा.
आता पेस्टमध्ये उरलेले दूध आणि साखर मिश्रीत पाणी आणि वेलची पावडर टाकून एकसाऱखे मिश्रण करा. तयार मिश्रण फ्रिजमध्ये १ ते २ तासांसाठी थंड करायला ठेवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -