डोळ्याखालील काळी वर्तुळे सहज करा दूर

अनेकांच्या सौंदर्यामध्ये डोळ्याखालील काळी वर्तुळे बाधा आणतात. मात्र असे काही उपाय आहेत ज्यामुळे काळी वर्तुळे सहज दूर होण्यास मदत होते.

Mumbai
how to remove dark circle
डोळ्याखालील काळी वर्तुळे सहज करा दूर

डोळ्याखालील काळी वर्तुळे सौंदर्यामध्ये बाधा आणतात. मात्र डोळ्याखालील ही काळी वर्तुळे अपुऱ्या झोपेमुळेच नाही तर प्रदूषण, धूम्रपान आणि सकस आहाराची कमी या कारणांमुळे देखील डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. मात्र घरगुती उपायांमुळे ही काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते.

दूध

दूधामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. यामुळे दूध हे गुणकारी मानले जाते. डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी थंड दूधामध्ये कापसाचे बोळे भिजत ठेवा आणि ते बोळे डोळ्याच्याखाली ठेवा. यामुळे काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते.

काकडी

काकडीमध्ये पाण्याचा अंश जास्त असल्याने ती आरोग्यासाटी गुणकारी असते. डोळ्याखाली काळी वर्तुळे असल्यास काकडीच्या गोल चकत्या काढून थंड करुन ते डोळ्यांवर ठेवल्यामुळे फायदा होतो.

मध

मध त्वचा कोमल ठेवण्यास मदत करते. डोळ्याच्या खाली मध लावा आणि वीस मिनिटे तसेच ठेवा. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. दररोज हा उपाय दोन वेळा करु शकता. यामुळे काळी वर्तुळे दूर होतात.

लिंबाचा रस

लिंबाचा रस हा मृत त्वचा काढण्यासाठी आणि त्वचा तजेलदार करण्यासाठी मदत करतो. कापसाच्या मदतीने डोळ्याखाली लिंबाचा रस लावून १० मिनिटे तसाच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे खूप फायदा होतो.

गुलाब जल

दोन मोठे चमचे गुलाब जलमध्ये काही मिनिटे कापसाचे बोळे भिजत ठेवा. नंतर डोळे बंद करुन भिजलेले कापसाचे बोळे डोळ्यावर ठेवा. या उपायाने डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर होतील.

कोरफड जेल

डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते.


वाचा – सौंदर्य खुलवण्यासाठी खोबरेल तेलाचे ७ फायदे

वाचा – ‘बटाट्याचे’ ५ सौंदयवर्धक फायदे!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here